बाईचे आधी तुकडे केले, आणि नंतर शिजवून खाल्लं.


बाईचे आधी तुकडे केले, आणि नंतर शिजवून खाल्लं.

कोचीः केरळमधी दोन महिलांच्या झालेल्या हत्येमुळे (Keral Murder Case) त्या राज्यासह देशभर खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जात पोलिसांनी काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

या झालेल्या नरबळीच्या (black magic) हत्येमुळे केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन (Chief Minister Pinarayi Vijayan) यांनीही शोक व्यक्त केला आहे. या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, ज्या महिलांची हत्या केली गेली होती.

हत्या करुन शरीराचे तुकडे करुन खड्यात पुरले होते. मात्र ज्या खड्यात महिलांच्या शरीराचे तुकडे करुन पुरले होते, त्याच खड्यातून आता तीन मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

या महिलांची हत्या केल्यानंतर मारेकरे एवढ्यावरच थांबले नाहीत तर महिलांच्या शरीरातील मासाचे तुकडे खाण्याचा किळसवाणा प्रकार केल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे.

या प्रकरणातील ज्या व्यक्तींनी महिलांची हत्या केली आहे, ती व्यक्ती फेसबुकच्या माध्यमातून लोकांचा शोध घेत होता.

कोची शहराचे पोलीस आयुक्त सी. एच. नागराजू यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, ज्या दोन महिलांची हत्या केली गेली आहे, त्या महिलांच्या शरीराचे अवयव आम्ही जप्त केले आहेत.

ते तपासणीसाठी पाठवण्यात आले असून महिलांची हत्या करुन, शरीरापासून अवयव वेगळे करुन आरोपींनी ते शिजवून खाल्याचा प्रकार त्यांनी केल्याचे पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यापुढील तपास अजून सुरु असून आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता असल्याचेही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

या प्रकरणातील मुख्य आरोपी शफीबाबत पोलीस आयुक्त नागराजू यांनी सांगितले की, शफी हा विकृत असल्यासारखा आहे.

या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याचाही शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी शफीची फॉरेन्सिक तपासणीसाठी पठाणमथिट्टामध्ये घेऊन गेल्यानंतर तो मुख्य सूत्रधार असल्याचे समजले. त्यानंतर या प्रकरणातील तो मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात उघड झाल्याचे समजले.

महिलांची हत्या करुन त्यांच्या शरीराचे तुकडे करणारे जो शफी आहे त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आर्थिक विवंचनेत सापडलेल्या व्यक्तींचा शोध घेत होता. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधून तो त्यांची हत्या करत होता असंही पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणाचा कसून तपास करण्यात येत असून हत्या झालेल्या महिलांचे लैंगिक शोषण करण्यात आले आहे का, त्याचाही शोध घेण्यात येत आहे.

त्यामुळे या प्रकरणातून आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
-०-

Kerala Human Sacrifice: विकृतीचा कळस! गरीबी दूर करण्यासाठी दोन महिलांचा नरबळी, हत्येनंतर खाल्लं मानवी मांस

Kerala Human Sacrifice Case : केरळमध्ये (Kerala) एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. केरळच्या पथानामथिट्टा येथे गरीबी दूर करण्यासाठी (Human Sacrifice) दोन महिलांचा बळी देण्यात आलाय.

याही पेक्षा धक्कादायक गोष्ट म्हणजे या महिलांच्या मृतदेहाचे तुकडे करून संशयितांनी ते शिजवून खाल्ले आहेत. नरबळीतून ही क्रूर हत्या केल्याचा पोलिसांचा संशय आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पथानामथिट्टा येथे एका दाम्पत्याने गरीबी दूर करण्यासाठी तात्रिकाच्या सांगण्यावरून दोन महिलांचा बळी दिला आहे. हत्या केल्यानंतर संशयितांनी महिलांच्या मृतदेहाचे जवळपास 56 तुकडे केले आणि ते शिजवून खाल्ले. पदमा आणि रोझलिन असे हत्या झालेल्या दोन्ही महिलांची नावे आहेत. या दोन्ही महिलांना बांधून त्यांची हत्या करण्यात आली. ही हत्या घरातील गरीबी दूर करण्यासाठी करण्यात आली असून पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे. भगवल सिंह, त्याची पत्नी लैला आणि तांत्रिक मोहम्हदी शफी अशी या आरोपींची नावे आहेत. चौकशीत पती-पत्नीने हत्येनंतर मृत महिलांचे मांस खाल्ल्याचे समोर आले आहे.

केरळमधील कोच्ची शहराचे पोलिस आयुक्त नागराजू चमिलम यांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवल सिंह आणि त्याची पत्नी लैलाने मृत महिलांचे मांस खाल्ले आहे की नाही याची माहिती मिळवण्यासाठी फॉरेंसिक तपास सुरू आहे. हत्या झालेली रोजनिल ही जून महिन्यात बेपत्ता झाली होती. तर पदमा सप्टेंबरमध्ये बेपत्ता झाली होती. पदमाचा शोध घेतला जात असताना या दोन्ही महिलांची हत्या झाल्याचे समोर आले. दोन्ही मृत महिलांचे फोन ट्रेस केल्यानंतर तांत्रिक मोहम्मद शफीबाबत पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने दोन्ही महिलांची हत्या केल्याचे कबूल केले आणि दोन्ही महिलांचे आपण अपहरण केल्याची माहिती पोलिसांना दिली.

तांत्रिक मोहम्मद शफी याने संशयित जोडप्याला सोशल मीडियाच्या माध्यामातून पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. त्यासाठी त्याने फेसबुकवर श्रेदेवी नावाने फेक अकाऊंट तयार केले होते. त्याने या जोडप्याला गरीबीतून बाहेर पडण्यासाठी नरबळीचा उपाय सांगितला. त्यानंतर नरबळी देण्यासाठी त्यानेच दोन महिलांचा शोध लावला.

विकृतीचा कळस
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिक शफी हा लैंगिक विकृत होता. त्याने रोजनिल हिला एका अश्लील चित्रपटात काम करण्यासाठी 10 लाख रुपये आणि पदमाला सेक्स वर्कर बनण्यासाठी 15 हजार रुपयांची ऑफर दिली होती. त्यानंतर रोजनिल हिला शूटींगच्या बहाण्याने बेडवर झोपवले. त्यानंर त्याच अवस्थेत त्याने तिला बेडसोबत बांधले आणि चाकूने वार करून तिची हत्या केली. तर पदमाने आपले पैसे मागितले त्यावेळी तिला दाव्याने बांधले. यातच ती बेशुद्ध झाली. त्यानंतर शफीने तिची देखील हत्या केली. एवढेच नाही तर हत्या केल्यानंतर दोन्ही महिलांच्या गुप्तांगामध्ये चाकूने वार करण्यात आले आणि रक्त फरशीवर शिंपडण्यात आले. त्यानंतर दोन्ही महिलांच्या शरीराचे तुकडे करून जमीनीत पूरण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post