येवली, शिवणी, डोंगरगाव, गोविंदपूर, गुरवळा गावात पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू आहे अवैध दारूचा महापूर

येवली:‘सद्रक्षणाय खलनिग्रहनाय’ हे ब्रीद बाळगून जनसामान्यांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या खाकी वर्दीतील पोलिसांवर कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची मुख्य जवाबदारी असते मात्र यातील काही भ्रष्ट पोलिसांमुळे या ब्रीद वाक्याला गालबोट लागण्याचा प्रकार कित्येक ठिकाणी घडत आहे.
ज्याची प्रणिती गडचिरोली पासून 10,11,12 किलोमीटर अनंतराव असलेल्या येवली, शिवणी, डोंगरगाव, गोविंदपूर, गुरवळा गावात पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असलेला अवैध दारूचा महापूर तसेच इतर अवैध व्यवसायातुन दिसत आहे.
गडचिरोली तालुक्यांतर्गत येणाऱ्या येवली, शिवणी, डोंगरगाव, गोविंदपूर,गुरवाला,गाव हे तंटामुक्त गाव असून विकासाच्या दृष्टिकोनातुन यापैकी येवली एक आदर्श गाव म्हणून निर्माण झाले होते व मागील काही पाच वर्ष खासदार च्या माध्यमातून संसद दत्तक गाव पण घोषित करण्यात आले होते.


मात्र मागील काही महिन्यापासून येवली गावातील जवळपास पाच ते सहा घरी बिनधास्त पणे अवैध दारूचा व्यवसाय सुरू आहे तसेच सट्टा, जुगार, व्यवसाय सुद्धा सुरू आहे ज्यामुळे गावातील कित्येकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत तर तरुणाई या व्यसनाकडे वळत असून तरुणाई नैराशेच्या खाईत झोकल्या जात आहे तर या गावाला पोलिसांच्या आशीर्वादाने या गावात पोलिसांचे कुठलेही भय राहले नसून पोलिसांना देत असलेल्या चिरीमिरी मुळे गावात अवैध व्यवसायाला उधाण आले आहे तसेच गावात सुरू असलेल्या या अवैध व्यवसायामुळे आदर्श गावाला गालबोट लागत असून तंटामुक्त गावातच तंटे निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावातील शांतता लक्षात घेता गावात कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस विभागाच्या वरिष्ठ पोलीस पदाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष पुरवून सुरू असलेल्या अवैध धंद्याला लगाम घालावे अशी मागणी येवली गावातील जागरूक ग्रामस्थानि केली आहे.
यासंदर्भात येवली बिट येथील पोलीस पाटील व शिष्टमंडळासह पोलीस विभागाला कित्येकदा माहिती देऊन सुद्धा पोलीस विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते परिणामी गावातील अवैध व्यावसायिकांचे मनोबल वाढलेले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post