पिडीत आदिवासी मुलीवर तिच्याच परिचित वर्गमित्रांनी आळीपाळीने केला अत्याचार

भंडारा :- तुमसर तालुक्यातील जंगलव्याप्त गोबरवाही पोलीस हद्दीत अल्पवयीन आदिवासी मुलीवर सामूहिक अत्याचाराच्या घटनेने परिसराला हादरवून सोडले आहे. सदर घटना मंगळवार ५ ऑक्टोंबर च्या पहाटे २:३० वाजेच्या सुमारास बावनथडी नदी पुलालगत एका निर्जन झोपडीत घडली आहे. पिडीत मुलीवर तिच्याच परिचित वर्गमित्रांनी आळीपाळीने अत्याचार केल्याची रीतसर तक्रार पिडीत मुलीने परिवाराच्या उपस्थितीत गोबरवाही पोलिसांत दाखल केली आहे.त्यात पिडीत अल्पवयीताने सूचना केलेल्या आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेला आरोपींमध्ये एक विधीसंघर्षग्रस्त तर दुसरा आरोपी अभिषेक प्रल्हाद कुंभरे(२०, राह. चिखली) यांचा समावेश आहे. तुमसर तालुका अनेक किरकोळ घटनांनी चर्चेत बनून राहते. मात्र विजयादशमीच्या दिवशी गोबरवाही पोलीसस्टेशन हद्दीतील एका आदिवासी बहुल गावात घडलेल्या सामूहिक अत्याचाराच्या घटनेने परिसराला हादरवून सोडले आहे. 

घटनेच्या पूर्व संध्येला ४ ऑक्टोंबर रोजी विधीसंघर्षग्रस्त परिचित मित्राने पिडीत मुलीला मध्यप्रदेशात कार्यक्रम पाहण्यासाठी जाण्यास तयार केले.त्याचे सोबत आरोपी अभिषेक हा देखील सोबत होता.दरम्यान पिडीत अल्पवयीन मुलगी अारोपी सोबत दुचाकीने बोनकट्टा (मध्यप्रदेश) येथे ४ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ४:३० च्या सुमारास जाण्यास निघाली. आरोपी अभिषेकने पीडितेला सह आरोपीसोबत अंजनबिरी (मध्यप्रदेश) येथे आपल्या मावशीच्या घरी नेले. दरम्यान मध्यरात्र झाल्याने आरोपींनी कार्यक्रम न बघता पीडितेसोबत स्वगृही परत निघाले.दरम्यान मध्यप्रदेशाच्या सीमेवर बावनथडी नदी पुलावर आरोपीने ५ ऑक्टोबरच्या २:३० वाजेच्या सुमारास दुचाकी थांबवली. लघुशंकेचा बेत करून पुलालगत असलेल्या झोपडीत दोन्ही आरोपींने पीडितेला आळीपाळीने अत्याचार केले.घटनेच्या पहाटे ३ च्या सुमारास पेट्रोलिंगवर असलेल्या गोबरवाही पोलिसांना पीडिता संशयास्पद स्थीतीत आढळून आली. तोच पिडीताने पोलीसांनी आपबिती सांगितली.त्यातून प्रकरण उजेडात आले. परिचित मित्रांनेच अस्मितेचा घात केल्याने स्तब्ध पिडीत मुलीने पोलीसांत रीतसर तक्रार नोंदवली. त्यातून दोन्ही आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले. गोबरवाही पोलीसांनी घटनेची नोंद ३७६(२)(आय), ३७६(डअ), ३४ सह बाल लैंगिक प्रतिबंध कायद्याचे कलम ४ व ६ अन्वये गुन्हा नोंद केला आहे.घटनेचा तपास प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी रीना जनबंधू व गोबरवाही पोलीस करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post