हॊ माझे पण ह्रदय तुटले होई

हॊ माझे पण ह्रदय तुटले होई

हॊ माझे पण ह्रदय तुटले होते
जेव्हा तू वाटेत एकटं टाकून गेला होता
स्वप्नांचा चुराडा झाला होता
जेव्हा तू माझी झोप उडवून गेला होता

बोल तुझे अबोले झालेत 
कुठे चुकले रे मी सांगशील का
वाट पाहुन थकली नाही कधी
वाट माझी सपंवशील का

रडवण्याचं अधिकारी तूच
प्रेमासाठी मीच भोळी झाली
आज अश्रूना बांध नाही
यातनेने तळमळू लागली

दया कशी रे येत नाही तुला
मला ही ह्रदय आहे नाजूक
घुटमळ बघवतेच कशी तुला
जी तुला आधी होती साजूक

हरली आज मीच प्रेमात
तुलाही मी जिंकू देणार नाही
तूझ्या प्रत्येक सुखात
माझ ह्रदयचं देईल दुःखाची ग्वाही

सौं रेश्मा. ग बावणे 🙏

Post a Comment

Previous Post Next Post