वारंवार तक्रार करूनही सांडपाणी व्यवस्थापनाकडे आरमोरी नगरपरिषदेचे दुर्लक्ष तातडीने कारवाही न केल्यास नाली बुजविण्याचा इशारा.


आरमोरी:-: येतील नंदनवन कॉलनी मधील श्री. दत्तात्रय डोमळू गिरडकर यांच्या घरापासून ते श्री. नत्थूजी आकरे यांच्या घरापर्यंत रस्त्याच्या फक्त एकाच बाजूला नाली बांधकाम केले असून नालीस योग्य उतार दिलेला नाही. त्यामुळे कित्येक वर्षांपासून नालीमध्ये सदैव सांडपाणी साचून असते. घान कचऱ्यामुळे आसपासच्या परिसरात भयानक दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव झाला आहे; त्यामुळे त्या भागातील रहिवास्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आरमोरी ग्रामपंचायत असल्यापासून नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही प्रशासनाने याकडे कानाडोळा केलेला आहे.

बारा वर्षांचा काळ लोटूनही परिस्थिती जैसे थे आहे. आरमोरी नगरपरिषद झाल्याला ३.५ वर्षे झालीत. त्यामुळे वस्तीतील नागरिकांमध्ये एक आशेचा किरण चमकला मात्र या कालावधीतही वारंवार पायपीट करूनही सदर प्रकरणाकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले..

मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, सांडपाणी व्यवस्थापन सभापती यांना लेखी निवेदने व प्रत्यक्ष भेटी घेतल्यावर त्यांच्याकडून कोरडी आश्वासने, थातुरमातुर व उडवाउडवीची उत्तरे प्राप्त होतात. एवढा काळ लोटून अजूनही कोणतीही हालचाल दिसत नसल्यामुळे नागरिकांमध्ये आरमोरी नगरपरिषदेविषयी तीव्र संताप निर्माण झाला आहे. नगरपरिषदेच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना शारीरिक, मानसिक, आर्थिक अपाय होऊन राहिलेत त्यामुळे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस नाली बांधकाम करावे व असलेल्या नालीस योग्य उतार काढून काँक्रीट कव्हर बसवावेत अशी मागणी आहे. सदर मागणी तातडीने पूर्ण न झाल्यास अस्तित्वास असलेली नाली बुजवून टाकण्याचा इशारा वार्डातील नागरिक व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका प्रसिद्धी प्रमुख आशुतोष गिरडकर यांनी दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post