महावितरण कर्मचाऱ्यांनी घरात शिरून केली दमदाटी वृत्तपत्र विक्रेत्याने केला आरोप



आष्टी : येथील वृत्तपत्र विक्रेता तथा वार्ताहर अशोक खंडारे यांच्या घरात शिरून वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वीजबिल न भरल्याची सबब पुढे करत दमदाटी केली. तसेच मारहाण करण्याची व वीजपुरवठा खंडित करण्याची धमकी दिली, असा आरोप खंडारे यांनी केला आहे.

अशोक खंडारे हे वृत्तपत्र विक्रेते आहेत. त्यांच्या वृत्तपत्राचे बिल महावितरण कंपनीच्या कार्यालयाकडून येणे बाकी आहे. नेहमीप्रमाणे खंडारे हे घरगुती वीजबिल वृत्तपत्राच्या बिलातून वजा करण्याची मागणी करत होते. तेव्हा खंडारे यांच्या घरी आलेले सचिन गायकवाड व अमित शेंडे आदींनी तुम्ही वीजबिल भरा, अन्यथा तुमचा वीजपुरवठा खंडित करतो. यानंतरच्या काळात तुमचे वीज कनेक्शन कोण जोडतो ते पाहूनच घेऊ, अशी दमदाटी केली. बाहेरून आलेल्या वसुली अधिकाऱ्याने मला दमदाटी केली, असा आरोप खंडारे यांनी केला आहे.

रोहित्र कोण दुरुस्त करणार?

आष्टी येथे अभियंता नियमित राहात नाही. वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. रोहित्र जळाल्यामुळे गेल्या १० दिवसांपासून आष्टीतील पाणीपुरवठा बंद आहे. या प्रश्नाकडे कंपनीचे कर्मचारी दुर्लक्ष करून सामान्यांना त्रास का देत आहेत, असा आरोप खंडारे यांनी केला आहे. विशेष म्हणजे, पाणी पुरवठा योजना बंद असल्याने नागरिकांना त्रास होत आहे.


Post a Comment

Previous Post Next Post