ट्रॅक्टरच्या चाकात अडकून युवकाचा मृत्यू



चालकाकडून घटना लपविण्याचा प्रयत्न

भंडारा, :- .ट्रॅक्टवर बसून जात असताना चाकात येऊन एका तरुण ठार झाला. घटना लपविण्यासाठी मृतदेह रुग्णालयात न नेता परस्पर पंपहाऊसच्या मागे नेऊन ठेवले. ही घटना साकोली पोलिस ठाण्यांतर्गत बोदरा येथे घडली. उकेश धनराज बोरकर (37), रा. पाथरी असे मृतकाचे नाव आहे.

उमेश यशवंत कठाणे (56) रा. फुले वॉर्ड साकोली यांच्या मालकीचा ट्रॅक्टर सुनील मोहन पंधरे (34) हा चालवीत होता. त्याच्याशेजारी उकेश बसला

होता. बोदरा ते साकोली मार्गावरील पंपहाऊसजवळ उकेश हा तोल जाऊन खाली पडला. यात ट्रॅक्टरच्या मागील चाकात येऊन तो गतप्राण झाला. घटना लपविण्यासाठी उकेशचा मृतदेह सुनीलने केशव धर्माजी बाळबुधे (50), रा. पाथरी याच्या साहाय्याने बोदरा पंप हाऊसच्या मागे नेऊन ठेवला. आपले कृत्य लपविण्यासाठी रक्त सांडलेल्या जागेवर माती टाकून दिली. यानंतर ते दोघेही पळून गेले. तक्रारीवरून साकोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post