मोखाळा येथील महीलेचा विषारी साप चावून मृत्यू

चिमूर - चिमूर तालुक्यातील नेरी वरून जवळ असलेल्या मोखाळा येथील जया चितांमन तामगाडगे वय- ५० वर्ष या महीलेचा राञोला झोपेत असतानी विषारी साप चावल्याने नागपुर मेडीकलला नेत असतानी तीचा मृत्यु झाला आहे . सवीस्तर वृत्त असे आहे की , नेरी जवळील मोखाळा येथील चितामन तामगाडगे व त्यांची पत्नी जयाबाई चिंतामन तामगाडगे हे १० ऑक्टोबंरला राञो जेवन करून झोपी गेलेत . १२ वाजताच्या नंतर राञो २.३० वाजता जयाबाई तामगाडगे हिला झोपेत असतानी विषारी सापाने चावा घेतला . हे कळताच तिला जाग आली आणी नंतर साप चावला असल्याचे लक्षात आले . लगेच तिला उपजिल्हा रूग्णालय चिमूर नेण्यात आले . तेथे ३-४ तास उपचार घेतल्यानंतर ११ऑक्टोबंरला सकाळी ७ वाजता तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी नागपुर मेडीकलला रेफर केले .पण मेडीकलला पोहचण्यापुर्वीच नागपुर येथील दिघोरीजवळ तिची प्राणज्योत मावळली .
ह्या तिच्या अचानक झालेल्या मृत्युमुळे मोखाळा येथे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .

Post a Comment

Previous Post Next Post