*'लष्कर - ए - देवेंद्र'ला मिळालेल्या पन्नास हजार रुपयांच्या गिफ्ट व्हाऊचरचा सर्वत्र बोलबाला* *शिंदेंच्या दरबारात आज निवडक पत्रकारांसाठी भंडारा !* *पत्रकारांनाही मिळणार 'खोके' ?*




*भाजप व शिंदे शिवसेना गटाचा घातक पायंडा*

*उन्मेष गुजराथी*
*Sprouts Exclusive*

*दिवाळीनिमित्त पत्रकारांना भेटवस्तू दिल्या जातात, हे सर्वांनाच माहिती आहे. परंतु यावर्षीच्या दिवाळीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 50 हजारांची गिफ्ट कार्ड दिल्यामुळे राज्यातील पत्रकारांच्या वर्तुळात हा एक चर्चेचा विषय ठरला आहे. या चर्चेला अनेक फाटे फुटले असून आता ही चर्चा थेट दिल्ली  दरबारी पोहोचल्याचेही समजते आहे.*

*उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीत मुंबईतील बहुसंख्य पत्रकार आहेत. त्यांना 'लष्कर ए देवेंद्र' म्हणून संबोधले जाते. या 'लष्कर - ए - देवेंद्र'मधील सर्वच ( नैतिकतेचा बुरखा पांघरलेले ) पत्रकार व संपादक यांना फडणवीस यांनी त्यांच्या 'सागर' बंगल्यावर बुधवारी दुपारी बोलावले. तेथे त्यांना स्नेहभोजन देण्यात आले. त्यानंतर त्यांना लाईनीत उभे करण्यात आले व ५० हजार रुपयांचे गिफ्ट व्हाउचर देण्यात आले. हे गिफ्ट व्हाउचर रिलायन्स कंपनीचे आहेत. या माध्यमातून फडणवीसांनी विकृत पायंडा पाडला आहे. खरे तर याची लोकायुक्तांकडे तक्रार करायला हवी, पण मांजराच्या गळ्यात घंटी कोण बांधणार?*

*आज रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दिवाळीनिमित्त पत्रकारांना स्नेहभोजन देण्यात येणार आहे. आधीपासूनच 'गिफ्ट' देण्यासाठी प्रसिद्ध असणारे एकनाथ शिंदे आता तर भेट मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या दरबारात किती रुपयांचे गिफ्ट कार्ड पत्रकारांना दिले जाणार आहे, यात्री उत्सुकता प्रसारमाध्यमांमध्ये आहे.*

दिवाळी म्हणली की भेट किंवा भेटवस्तू आलीच. एरवी सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढणा-या माध्यमवर्गामध्ये पूर्वीपासूनच दिवाळीचे अप्रूप आहे. सत्ताधारी वर्ग त्याचबरोबर अन्य माध्यमांतूनही पत्रकारांना याकाळात भेटी मिळतात. पण यावर्षी दिवाळी गाजतेय ती फडणवीसांच्या मोठ्या गिफ्टमुळे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी असतानाही त्यांनी कधी गिफ्ट कार्ड किंवा तत्सम रक्कम पत्रकारांना देण्याचे प्रकार केले नव्हते. पण यावेळी त्यांच्याकडुन तब्बल 50 हजार रुपयांचे गिफ्ट कार्ड दिले गेल्यामुळे माध्यम वर्तुळात मोठे आश्चर्य व्यक्त केले गेले. वास्तविक असले प्रकार याआधी एकनाथ शिंदेंकडून केले गेले होते. *फडणवीस अशा दानकार्यासाठी कधीही प्रसिद्ध नव्हते. परंतु यावेळी या बाबतीत शिंदेना आपण 'ओव्हरटेक' करू, या विचाराने असेल, फडणवीसांनी हा 'प्रताप' केला.* पण त्यांच्या या महाप्रतापाचीही चर्चा थेट दिल्ली दरबारी पोहोचल्यामुळे त्यांचीही सध्या कुचंबणा झाल्याची सध्या चर्चा आहे.

*गेल्या काही दिवसांपासुन राज्यातील राजकीय वर्तुळात वेगळे वारे वाहत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गृहमंत्री व भाजपचे सर्वशक्तिमान नेते अमित शहा यांच्याशी गट्टी जमविल्यामुळे त्यांच्यामध्ये आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये वितुष्ट आल्याचे, स्प्राऊट्सच्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमला समजते आहे. त्याचीच परिणती म्हणजे दसरा मेळाव्याला झालेली शिंदे- शिवसेनेची फजिती होय. सर्व प्रमुख वृत्तपत्र समूह व वृत्तवाहि-यांना भरघोस पैकेज दिले गेले असतानाही सर्व प्रसारमाध्यमांनी वृत्तांकन करताना शिंदेंच्या मेळाव्याची फजिती उडाल्याची वस्तुस्थिती मांडली व दाखवली. त्यामुळे अलिकडे शिंदे प्रसारमाध्यमांवर काहीसे नाराज असल्याचे दिसते. या कारणामुळेच सालाबादप्रमाणे मुख्यमंत्र्यांकडे स्नेहभोजनही शिदे यांना दिवाळी झाल्यांनंतर ठेवाल्याचे म्हटले जात आहे.*

*घातक पायंडा*
*दिवाळी भेट देणे ही सामान्य गोष्ट आहे. सर्व उदयोगांमध्ये दिवाळी भेट किंवा बोनस हा प्रकार असतोच-  परंतु पन्नास हजारांची गिफ्ट कार्ड देणे हा निश्चित घातक व विकृत पायंडा आहे. थेट लाच देता येत नसल्याने गिफ्ट कार्ड देऊन पत्रकारांवर आपला दबाव ठेवणे, हाच उद्देश यामागचा असल्याचे दिसून येत आहे. फडणवीसांनी याबाबत पुढाकार घेतल्यामुळेच त्यांच्या विश्वासार्हतेवरच  प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे.*

*माध्यमांमध्येही 'खोके' संस्कृती आणणार*
*शिंदे-फडणवीस सरकारच शिवसेनेतील ऐतहासिक बंडानंतर स्थापन झाले आहे. त्याला गुवाहाटीतील 'खोके' संस्कृतीचीही किनार आहे. असे असताना 'खोके-खोके' पुकारुन संबंधित आमदारांना प्रत्येक वेळी जाब विचारणा-या माध्यमवर्गालाच आता खोके संस्कृतीत बाटवण्याची ही सर्व तयारी आहे काय, अशी शंका काही वरिष्ठ पत्रकारांनी 'स्प्राऊट्स'शी बोलताना व्यक्त केली.*

*'लष्कर-ए-देवेंद्र' ची मुख्यमंत्र्यानीच घेतली दहशत*

*देवेंद्र फडणवीस हे पाच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री होते. त्याकाळात त्यांचे माध्यमांवर बारीक लक्ष होते. कुठला संपादक किंवा पत्रकार कोणाला भेटला, कोणाचा कुठे संपर्क आहे. याची इत्यंभूत माहिती त्याकाळी फडणवीसांना समजत असे. त्यांची हीच पद्धत आताही सुरु झाल्याची माहिती 'स्प्राऊट्स'च्या हाती आली आहे. या माध्यमातील 'लष्कर ए देवेंद्र'चा धसका आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच घेतल्याची माहिती आहे. देवेंद्र यांनीही याबदल्यातच आपल्या मर्जीतील पत्रकारांना ही पन्नास हजार रुपयांची 'दिवाळी' दिलेली आहे.*

*Unmesh Gujarathi*
Editor in Chief
sproutsnews.com 

epaper.sproutsnews.com

businessnews1.com

moneynews1.com

https://www.facebook.com/unmesh.gujarathi.1/

twitter.com/unmeshgujarathi

https://www.linkedin.com/in/unmesh-gujarathi-4125481a/

Call: 9322 755098

*Scribes line up to collect Diwali Bakshish*
 
*Shameful performance of journalists at Diwali bash*
 
*Lashkar-e-Devendra’s Rs 50,000 gift vouchers in debate*
 
*A feast for scribes in Shinde’s court (Darbar)*
 
*The scribes too join the list of “Khoka Receivers”*
 
*BJP, Shinde laying new tradition*

*Unmesh Gujarathi*
*Sprouts Exclusive*
 
*Deputy Chief Minister Devendra Fadnavis distributed gift vouchers of Rs 50,000 to selected Journalists on the occasion of Diwali generated new controversy which has now reached BJP High command in New Delhi.*
 
*Fadnavis hosted a lunch party to select journalists known as “Lashkar-e-Devendra” at his official residence Sagar on Wednesday and also handed over gift vouchers to them. Ironically the scribes were made to queue up to collect the vouchers and even senior journalists and editors queued up to collect the alms. The vouchers belong to Reliance Industries. However this largesse is viewed as a bad precedent which can invite a complaint to Lokayukta.*
 
Chief Minister Eknath Shinde has organised a Diwali feast for scribes on Sunday. Shinde, already known for doling out costly gifts, is expected to give much costlier gifts to the journalists. As such they are curious.
 
The scribes who normally prefer to shred politicians into pieces always long for good gifts. They get costly gifts from the politicians, especially from the powers-that-be.  But this time the gift business is at its height due to Fadnavis’s Rs 50,000 gift vouchers.
 
*Basically Fadnavis is known as a spendthrift, although Shinde is known for giving costly gifts. It seems that Fadnavis who is overshadowed by Shinde in terms of publicity, has indulged into this adventure to “over take” Shinde.  But the matter has reportedly reached BJP high command.*
 
*Shinde has developed a rapport with Union Home Minister Amit Shah due to which his relation with Shinde has soared, the Sprouts SIT has learnt. That was the reason Shinde’s Dussehra rally at BKC was projected in poor light by the media. Allegedly at the behest of Fadnavis. Shinde had made a good arrangement of “paid-journalism” by keeping a section of the media happy. Yet Fadnavis played a spoilsport and turned the table on Shinde.*
 
*Bad precedent*

*The exchange of sweets during Diwali is common. But to distribute the gift vouchers worth Rs 50000 each is a bad precedent because it is an attempt to buy over the scribes. This could doubt the credibility of the scribes as well as Fadnavis.*
  
*'Khoka' culture*

*Costly gift vouchers are nothing but an attempt to corrupt the journalists engaged in exposing corruption la Guwahati style, some of the senior journalists said.*

*Former CM Fadnavis is known for collecting minute information about journalists. He has continued with this practice and even Shinde is scared of the coterie around Fadnavis.*

*Unmesh Gujarathi*
Editor in Chief
sproutsnews.com 

epaper.sproutsnews.com

businessnews1.com

moneynews1.com

https://www.facebook.com/unmesh.gujarathi.1/

twitter.com/unmeshgujarathi

https://www.linkedin.com/in/unmesh-gujarathi-4125481a/

Call: 9322 755098

Post a Comment

Previous Post Next Post