आईचं विवाहबाह्य संबंध, दोन्ही मुलींचेही होते ब़ॉयफ्रेंड, प्रेमाखातर तिघांनीही रचला असा डाव, घटना एकूण अंगावर काटा येईल

उत्तर प्रदेश:- गेल्या काही वर्षापासून देशात विवाहबाह्य संबंधांच्या (Extra Marital Affair) घटना वाढल्या आहेत. या वाढत्या घटनेमुळे गुन्ह्यांचे प्रमाणही वाढले आहे. त्यात आता एक अशी विवाहबाह्य संबंधांची घटना समोर आली आहे. ही घटना एकूण तुमच्या पायाखालची जमीन सरकणार आहे. या घटनेत आई आणि तिच्या दोन्हीही मुलींचे प्रियकर होते. या प्रियकरांचा प्रेमात आकंठ बुडालेल्या या तिघीही कुटूंबियांच्या जीवावर उठल्या होत्या. या घटनेने कुटूंबियांना मोठा धक्का बसला आहे.नेमका हा घटनाक्रम काय आहे, तो जाणून घेऊयात.


घटनाक्रम काय? 

या घटनेत सुनेचे (Women Affair) गावातल्याच एका तरूणासोबत अफेयर होते.तसेच या महिलेच्या दोन मुलींचे देखील गावातल्याच तरूणांसोबत प्रेमप्रकरण (Love Affair) होत. या घटनेची कल्पना कुटूंबियांना मिळाली होती. त्यामुळे कुटूंबियांनी या प्रेमाला विरोध करायला सुरुवात केली होती. कुटुंबीयांनी तिघींना घरातून बाहेर येण्यास बंदी घातली होती. त्यामुळे तिघींनाही त्याच्या प्रियकरांना ना भेटता येत होते, ना फोनवर बोलता येत होते. त्यामुळे या तिघीही प्रियकरांपासून दुरावल्या होत्या. यानंतर या तिघींनी आपआपल्या प्रियकरासोबत मिळून कुटूंबियांना संपवण्याचा डाव रचला होता. 
 


असा रचला कट

घरातून होत असलेल्या या विरोधाला कंटाळून तिघींनी संपुर्ण कुटुंबियांना विष पाजून (Poison) संपवण्याचा कट रचला होता. या कटात तरूणींचे प्रियकर देखील सामील झाले होते. हा कट रचल्यानंतर ते पळून जाणार होते.आणि त्यानंतर पुन्हा गावात परत येऊन मालमत्तेचा ताबा घेण्याचा प्लान त्यांनी रचला होता. 


जीवे मारण्याचा असा केला प्रयत्न

मुलींच्या प्रियकरांनी (Girl Boyfriend) विष (Poison) आणलं होतं. हे विष कुटूंबियांच्या जेवणात टाकून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला गेला. घरातल्याच मुलीने जेवणात विष कालवलं आणि ते आजी, आजोबा, वडील आणि आपल्या दोन काकांना दिले होते. हे जेवण खाऊन कुटूंबिय बेशुद्ध झाले होते. तर आईसह तरूणींनी प्रियकरांसह गावाबाहेर पळ काढला होता. 


अशी मिळाली घटनेची माहीती

या घटनेनंतर शेजाऱ्यांना घर बंद असल्याने संशय आला होता. तसेच घरात काहीच हालचाल होत नव्हती. त्यामुळे शेजाऱ्यांनी घरात जाऊन पाहिले असता त्यांना धक्काच बसला. या घटनेची माहिती त्यांनी पोलिसांनी (Police) दिली त्यानंतर ही घटना उघडकीस आली होती. यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. यामधील सर्वांचे प्राण वाचले होते, फक्त मुलींच्या आजीची प्रकृती गंभीर आहे. 


विष देऊनही वाचले कसे 


दरम्यान या घटनेनंतर असा प्रश्न पडला आहे की, जेवणात विष (Poison) मिसळून देऊन सुद्धा कुटूंबीय कसे वाचले. तर त्याच झालं असं की जेवणात विष मिसळताना मुलीचं हृदय हेलावलं होत. सगळ्यांचा जीव जाऊ शकतो या भीतीने ती घाबरली होती. त्यामुळे तिने जेवणात विषाचा डोस कमी टाकला होता. त्यामुळे विषाचा जास्त परिणाम होऊ शकला नाही आणि त्यांना रूग्णालयात दाखल करताच सुदैवाने ते बचावले. 


आरोपींना अटक 

पोलिसांनी (Police) या प्रकरणी तपास करून 5 जणांना अटक केली आहे. या पाचही जणांची रवानगी जेलमध्ये करण्यात आली आहे. यामध्ये महिलेच्या प्रियकराचा समावेश नव्हता.फक्त आई आणि तिच्या दोन मुली आणि त्यांचे दोन प्रियकर या कटात सामील होते.तसेच या घटनेत विषारी अन्न प्राशन करणाऱ्या चौघांची प्रकृती ठीक असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 


उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेने संपुर्ण राज्य हादरलंय.

Post a Comment

Previous Post Next Post