दिपावलीनिमित्त राष्ट्रवादीकडून स्वस्त दरात दिवाळी साहित्य वाटप



विरेंद्र म्हात्रे उपसंपादक नवी मुंबई : दिपावलीनिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस नेरूळ तालुक्याच्या वतीने रहीवाशांसाठी स्वस्त दरात साहित्य वाटप करण्यात आले. शनिवार, रविवार, सोमवार असे तीन दिवस राष्ट्रवादीचे नेरूळ तालुकाध्यक्ष महादेव पवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

नेरूळ सेक्टर सहामधील महादेव पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये विक्री करण्यात आलेल्या दिवाळी साहित्यामध्ये रवा, मैदा, साखर, गुळ, तेल, डालडा समावेश आहे. रवा व मैदा ३१ रूपये किलो, गुळ ५० रुपये किलो, तेल ११० लीटर,डालडा १०० रुपये किलो, साखर ३८ रुपये किलो या दराने राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून साहित्याची विक्री करण्यात आली. तीन दिवसीय चालललेल्या साहित्य विक्री कार्यक्रमात साहित्य घेण्यासाठी नेरूळ नोडमधील रहीवाशांनी विशेषत: महिलांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुकाध्यक्ष महादेव पवार, यशवंत मोहीते, प्रमोद शेळके, रविंद्र सुर्वे, रोहिदास हाडवळे, राजेंद्र कोरडे, रोहन वाघ, सुषमा पवार, सुजाता घारे, वर्षा भोर, संगीता सावंत, अनिता शिंदे, शुभदा करदेकर, वंदना भोसले आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post