धक्कादायक! आरोग्य केंद्रात नर्सला बांधून केला सामूहिक बलात्कार, अत्याचाराचे चित्रीकरण केल्याने संताप


छत्तीसगडमध्ये आरोग्य केंद्रात एका नर्सला बांधून तिच्यावर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर छत्तीसगडमध्ये एकच खळबळ उडाली असून महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर राज्य सरकारवर टीका केली जात आहे. नर्सवर बलात्कार करणाऱ्या चारपैकी तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यातील एक आरोप अल्पवयीन असून चौथा आरोपी फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत

मिळालेल्या माहितीनुसार छत्तीसगडमधील महेंद्रगड जिल्ह्यातील छिपछीपी या गावात शुक्रवारी (२१ ऑक्टोबर) ही घटना घडली आहे. येथील आरोग्य केंद्रात पीडित नर्स एकटीच काम करत होती. हीच संधी साधून आरोपींनी संध्याकाळी साधारण ३ वाजेच्या सुमारास आरोग्य केंद्रात प्रवेश केला. त्यानंतर आरोपींनी पीडित नर्सला बांधून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. विशेष म्हणजे आरोपींनी या अत्याचाराचे चित्रण केले असून याबाबत कोणाला सांगितले तर जीवे मारण्याची धमकी त्यांनी पीडित नर्सला दिली आहे. तसा दावा पीडित नर्सने केला आहे.

वाघाच्या हल्ल्यात इसम ठार
👇👇👇👇👇👇


घटनेनंतर पीडित नर्सने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. दरम्यान या घटनेनंतर छत्तीसगडमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. भारतीय जनता पार्टीकडून भुपेश बघेल यांच्या सरकारविरोधात मोर्चा काढण्यात आला. तर महेंद्रगडमधील काँग्रेसचे आमदार विनय जैस्वाल यांनी भाजपा या घटनेचे राजकारण करत असून आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post