सबको जेलमे डालूंगा.फडणवीस साहेब,किसको?



   मा.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऍक्शन मोड मधे आलेले दिसले.टिव्ही चैनेलवर बोलले , "भ्रष्टाचारी आधिकाऱ्यांना सहन करून घेणार नाही.त्यांना नोकरीतून काढून टाकू. " असे ऐकताच मला खूप आनंद झाला.युरेका,युरेका.सापडला.सापडला.महाराष्ट्रात एक प्रामाणिक माणूस सापडला.अंगावर कपडे आधीच होते म्हणून मी आर्किमीडीज सारखा नागडा पळत सुटलो नाही.कारण तसेच आहे.फडणवीस जे बोलले ते खरे करून दाखवतील कि नाही ?मला तरी शंका आहे.कारण फडणवीस साहेबांचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे तर स्पष्ट म्हणाले कि, "आमच्या सोबत एकही आमदार प्रामाणिक नाही.आणि तुम्ही भ्रष्टाचारी गुलाबरावला मंत्री बनवू नका,असे सांगतात.ज्याला तुम्ही भ्रष्टाचारी म्हणतात,ते तर आमच्या पहिल्या फळीत मंत्री बनवणार आहोत."
      फडणवीस साहेब,कालच मी जळगाव जिल्ह्यातील भाजपचे संकटमोचक नेते मा.गिरीश महाजन यांना समक्ष भेटून सांगितले कि, जळगाव जिल्हा परिषद पंकज आशिया भ्रष्ट माणूस आहे.तुम्ही ग्रामविकास मंत्री म्हणून कारवाई केली पाहिजे.या माझ्या सोबत, संपूर्ण जळगाव जिल्ह्यात या आशियांनी किती गडबड घोटाळे केले,हे मी पुरावासहित सांगतो.सीइओ ,बीडीओ भ्रष्ट आहेत.हे सिद्ध करण्याची जबाबदारी माझी.फक्त तुम्ही सहा तास वेळ द्या.झेडपीच्या सभागृहात.तुम्ही ग्रामविकासमंत्री बनताच जळगांव जिल्ह्यात चर्चा चालू आहे कि,"काम बंद ,हप्ता चालू." तेंव्हा महाजन साहेब थोढे अवघडले.पण आमदार चंद्रकांत पाटील साहेब तेथेच त्याच क्षणी बोलले कि , " शिवराम पाटील सांगतात तर त्यात तथ्य आणि सत्य असलेच पाहिजे."
मी वाट पाहातो मंत्री मा.गिरीश महाजन यांची."हप्ते बंद आणि काम चालू"करण्याची.
        मी दुसरी तक्रार केली कि, जळगाव जिल्ह्यात कोरोना काळात ४६कोटी ७२लाखाचा खर्च दाखवला पण उपयोगिता प्रमाणपत्र नाही.सेंट्रल आडिट ने अहवाल दिला आहे.आणि सिव्हिल सर्जन डॉ एन एस चव्हाण यांनी विधीवत पत्र दिले आहे कि, सर्वच गोटी खरेदी , पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सुचनेवरून केली आहे.दोन लोकांनी जळगाव जिल्हा पेठ पोलिस स्टेशनमध्ये स्वतंत्र तक्रार दाखल केली आहे.सहा महिने झाले.एफआयआर अद्याप नोंदवली नाही.कोर्टात खटला दाखल केला.कोर्टाने सीआरपीसी १५६।३अंतर्गत चौकशी करून आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश दिले.पांच महिने झाले.अजून आरोपपत्र दाखल केले नाही.आणि तुम्ही बढाई मारतात कि,मी भ्रष्टाचारी आधिकारीला सोडणार नाही.  
मी अभ्यास करून सांगतो कि, पालकमंत्री गुलाबरावव पाटील यांनी नक्कीच चोरी केली आहे.ते सिद्ध करण्याची जबाबदारी माझी.तसे जाहिर आवाहन गुलाबराव पाटील यांना मी दिले आहे.पण ते तोंड लपवत आहेत.तेव्हा मंत्री महाजन यांना वाईट वाटले.ते म्हणाले,या भ्रष्टाचाराला कलेक्टर अभिजीत राऊत हेच जबाबदार आहेत. "हो!ते पण जबाबदार आहेतच.पण गुलाबराव पाटलांची त्यातून सुटका नाही.तुमचे सगे सोयरे आहेत म्हणून माफ करू नका.तुमच्यासोबत मंत्री आहेत म्हणून त्यांच्या "गु"वर माती झाकू नका.चोरांची पाठराखण करू नका‌.मग ते मंत्री असोत कि अधिकारी."
    फडणवीस साहेब, जळगाव जिल्हा भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे.सुरेश जैन , एकनाथ खडसे, गुलाबराव पाटील यात वाहात गेले.किमान गिरीश महाजन यांनी तरी बचावाचे धोरण ठेवू नये.नाहीतर जळगाव चे नांव गिनीज बुक मधे नोंदवले जाईल.जगातील सर्वाधिक भ्रष्ट लोकांचा जिल्हा.
       फडणवीस साहेब, जळगाव जिल्ह्यातील भ्रष्टाचार बाबत मी आपणास कुठे भेटू ?ते सांगा.तुम्ही जळगाव ला येतात कि मी मु़ंबईला येऊ?पण तुम्ही जे बोलले ते एकदा खरे करून दाखवाच.फडणवीस साहेब,कोणताही फौजदार नवीन पोस्टींग वर आला कि,असाच दम भरतो." मला भ्रष्टाचार चालणार नाही."याचा अर्थ हाच कि ,आपले हप्त्याचे दर वाढवले पाहिजे.याचे तुम्हाला ज्ञान असलेच पाहिजे. ‌ तसाच दम तुम्ही भरत नाही ना ? हो.मला संशय आहे.संशय कायम राहिल.जोपर्यंत तुम्ही बोलले तसे वागले नाहीत, तोपर्यंत.आणि तुम्ही जर टाळाटाळ केली तर आम्ही जाहीर सांगू कि,हा दम फक्त वसुली वाढवण्यासाठी भरला आहे.
     फडणवीस साहेब, तुम्ही मुख्यमंत्री होता, तुम्ही उपमुख्यमंत्री आहात.तरीही मी एक कॉमन मॅन तुम्हाला आवाहन करतो." देखना है,किसमे कितना है,दम?"
     मी जर पत्र लिहीले.ई मेल केला तर ,मला उत्तर मिळते,मला मिळाले नाही.पण जाहीर पत्र लिहीले तर लोक सांगतील कि, शिवराम पाटील यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना. उघड चैलैंज केले आहे." देखना है,किसमे कितना है, दम?"
    फडणवीस साहेब,डोण्ट अंडरइस्टीमेट कॉमन मॅन.धीस कॉमन मुइए द मिस्टर इंडिया.जो तुम्हाला सत्तेवर आणतो,जो तुम्हाला खाली खेचतो.

.... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव.

Post a Comment

Previous Post Next Post