आरमोरी येथे शिक्षक दाम्पत्याच्या घरी चोरीप्रकरणी दोघांना अटक



आरमोरी :- येथील विद्यानगरात वास्तव्यास असलेले शिक्षक दाम्पत्य शाळेत शिकवायला गेले असताना भरदिवसा चोरट्यांनी त्यांच्या घराच्या पहिल्या मजल्यावरील मुख्य दरवाजा फोडून सव्वा लाख रुपयांचा माल लंपास केल्याची घटना १२
ऑक्टोबरला दुपारी घडली होती. यातील दोन आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. शाहीदअली हमीदअली शाहा (१९ वर्षे) आणि असलम हाजीमउल्ला शाहा (१९ वर्षे) अशी आरोपींची नावे असून ते दोघेही मूळचे उत्तर प्रदेशातील आहेत.

येथील विद्यानगरातील रहिवासी चंद्रभान उईके या शिक्षकाकडे ही चोरी झाली होती.

घटनेच्या दिवशी दोघेही पती-पत्नी व त्यांच्या दोन मुली शाळेत गेले असताना चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटाचे लॉक तोडून ३० ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख २२ हजार रुपये असा ऐवज लंपास केला होता.

Post a Comment

Previous Post Next Post