पटवारी आणि वनविभाग यांची अवैध रेती माफियां सोबत साठगाठ ? माफियांची वाटते भीती

चिमूर : - चिमूर तालुक्यात वनविभाग , तलाठी , आर.आय , मंडळ अधिकारी , तहसीलदार , उपविभागीय अधिकारी , वाहतूक पोलीस , पोलीस निरीक्षक अवैध रेती माफियांवर कारवाई करण्यात असमर्थ ठरत आहे .यामुळे रात्रीच्या वेळेस राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई लगत राहात असलेल्या जनतेला या ट्रॅक्टर च्या सायलेन्सर फुटलेल्या कर्कश आवाजामुळे रात्रीची झोप उडाली आहे. गस्तीवर असलेले काही पोलीस अधिकारी यांनी रेती माफीयांशी हातमिळवणी केल्याची सुद्धा जनतेमध्ये चर्चा आहे. म्हणूनच या रेती माफियांची मोठ्या प्रमाणावर दादागिरी वाढत चाललेली दिसून येत आहे.काही दिवसांपूर्वी दोन अवैध रेती माफियांनी पत्रकारांस जीवे मारण्याची धमकी दिली होती. 


हे चित्र नवीन असून सुद्धा महसूल अधिकारी झोपी गेल्यासारखे दिसून येत आहे.या अवैध रेती व्यवसायामध्ये राजकिय पक्षाच्या महिलांचा सुद्धा समावेश आहे.अशीही मोठ्या प्रमाणावर जनतेमध्ये चर्चा रंगली आहे. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी यांचेही लक्ष दुर्लक्ष होतांना दिसत आहे. स्वतः जिल्हाधिकारी यांनी गोपनीय भरारी पथक नेमून या रेती माफियांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी जनतेकडून केली जात आहे.दैनंदिन अवैध रेती संदर्भात अनेक डिजिटल पोर्टल आणि वृत्तपत्रामध्ये बातम्या प्रकाशित करून आणि अधिकारी यांना अवैध रेतीच्या साठया बद्दल वनविभाग व महसूल विभागाचे कर्मचारी अधिकारी सर्व साधारण जनतेचे फोन उचलत नाही पथक नाही आहे म्हणून कारवाई नाही अशी शोकांतिका आहे.रात्रीच्या अंधारात महागड्या कारणे पटवारी वर्गाची रेती माफियांसोबत हातमिळवणीची सुद्धा मोठ्या प्रमाणावर तालुक्यात चर्चा आहे.



Post a Comment

Previous Post Next Post