देसाईगंज नैनपुर/शास्त्री वार्डातील तलावावरील रोडचे सिमेंट काँक्रीट चे काम पुर्ण करण्याची आप ची मागणी



देसाईगंज :नैनपुर/शास्त्री वार्डातील जवळपास 50 टक्के जनता तथा विधार्थी तलावाच्या पाळीने ये-जा करीत असतात.तसेच देसाईगंज येतील दुर्गा व गणपती विसर्जन देखील नैनपुर तलावात करण्यात येत असते
          आज जवळ पास दोन वर्षाचा कालावधी पुर्ण होवुनही सदर तलावाच्या पाळीवरील रोड चे सिमेंट काँक्रीटचे काम पुर्ण झालेले नाही त्या मुळे नगरवासीयांना व आम जनतेला हयाचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.एखादवेळी मोठी दुर्घटना होवुन अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही 
असे निवेदन देताना आम आदमी पक्षा चे पदाधिकाऱ्यांनी न.प.देसाईगंज चे अधिकार्याना तोंडी व लेखी मागणी केली 
त्या वेळी 
आम आदमी पक्षाचे
 तालुका अध्यक्ष भरत दयलानी , शहर अध्यक्ष आशिष घुटके, शहर उपाध्यक्ष नवेद शेख, शहर सचिव तबरेज खान, महिला उपाध्यक्ष नुरजाहा पठाण, तालुका सचिव दीपक नागदेवे , प्रमोद दहीवले, अतुल ठाकरे, नाजुक लुटे,आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post