लवकरच तलाठी संवर्गातील १ हजार पदांची भरती – महसूलमंत्री


महसूल विभागांतर्गत प्रथम टप्प्यात तलाठी संवर्गातील(Talathi Bharti) भरण्यात येणाऱ्या १ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांसमवेत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठक घेतली. गावोगावी कार्यालयीन कामकाजाचे नियोजन करताना वार आणि वेळही ठरवून घ्यावी, असे निर्देश बैठकीत दिले. अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ट्वीट करून दिली. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी तलाठी भरतीची वाट पाहत असून लवकरच पारदर्शक पद्धतीने भरती व्हावी अशी भावना लाईव्ह जनमतशी बोलताना विद्यार्थी यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post