पोलीस विभागाच्या डोळ्याला मोतीबिंदू..... शस्त्रक्रियेची आवश्यकता...?

अवैध धंदे करणाऱ्या मालकांची छाती 56 इंचाची....

उपक्षम रामटेके//विशेष प्रतिनिधी

    भिसी पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या जांभूळघाट या गावा मध्ये अवैध धंदे चोरात चालू असून पोलीस विभागाचे दुर्लक्ष असणे हेच न समजणारे कोडे आहे..
जांभुळ घाट येथे अवैध दारू विक्री सोबत सट्टापट्टी चालू असून जुगार सुद्धा जोमात चालू आहे गावाची संसद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत समोर असलेल्या सामाजिक व्यासपीठामध्ये अक्षरशः दररोज जुगार खेळल्या जातो.

व्हिडियो जरूर बघा
👇👇👇👇


   या जुगार खेळणाऱ्या लोकांसमोर जनतेने निवडून दिलेले जनप्रतिनिधी (सरपंच, सदस्य) नतमस्तक होतात की काय हे कळायला मार्ग नाही.
शैक्षणिक क्षेत्राची जननी असलेला हा गाव अवैध धंद्याची माता बनली आहे.
अवैध धंदे करणारा समोर सरकारी यंत्रणा हतबल आहे हे या गावावरून दिसून येत आहे.


 56 इंच छाती असणाऱ्या अवैध धंदे करणाऱ्या लोकांची आणि पोलीस विभाग यांच्यात येत्या काळात काय घडून येते याकडे जनतेचे लक्ष असणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post