वेडसर पतीने सुरीने डोक्यावर वार करून केली पत्नीची हत्या

दिनेश बनकर जिल्हा प्रतिनिधि गडचिरोली
.
 येरकड:- वेडसर पतीने घरी कोणी नसल्याचे पाहून सुरीने डोक्यावर वार करून पत्नीची हत्या केल्याची घटना दिनांक 4 ऑक्टोंबर सकाळी दहा वाजता च्या सुमारास धानोरा तालुक्यातील येरकड हद्दीतील कोवानटोला(जपतलाई)येथे उघडकिस आली आहे. प्राप्त माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी धानोरा अंतर्गत येत असलेल्या पोलीस मदत केंद्र येरकड हद्दीतील घटना,मीराबाई परसराम कुंमरे वय 45 वर्ष रा.कोवानटोला (जपतलाई) असे मयतीचे नाव आहे. 
सदर मयत महिला व तिचे पती परसराम धनु कुमरे वय 48 वर्ष रा. कोवांनटोला(जपतलाई )दोघेही आपल्या राहत्या घरी एकत्र होते. घटनेच्या दिवशी मुलगा अजय परसराम कुंमरे वय 23 वर्ष हा बाहेरगावी गेला होता.बाहेरगावी जाते वेळी आपल्या आईला सायंकाळी झोपण्यासाठी मामाच्या घराकडे जाशील असेही सांगून गेला होता. मामाचे घर पण त्याच गावी असल्याने मुलाने सांगितले.वडील वेडसर पणाचे असल्यामुळे अस त्यांनीे सांगीतले होते. आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास मयतीचा भाचा सुनील पोटाविहा आत्याच्या घराकडे जाण्यासाठी निघाला असता मयतीचा पती हे दारासमोर कुऱ्हाड घेऊन बसून असल्याचे आढळले. कुराड हातात असल्याने त्यांना शंका उपस्थित झाली घरात मध्ये जात असताना अचानक त्यांच्यावरच कुऱ्हाडीने वार करण्यासाठी धावून आला.त्यामुळे त्यांना काहीतरी घडल्याची शंका उपस्थित झाली व त्याचवेळी त्यांनी गावातील पोलीस पाटील सरपंच यांना व गावकऱ्यांना सूचना देऊन त्यांच्या घराकडे धाव घेतली असता व त्यांना प्रेमाने विचारले असता सर्व हकीगत त्यांनी सांगितले,की मी माझ्या पत्नीच्या डोक्यावर सूरीने वार करून ठार केल्याचे त्यांनी सांगितले.
लगेच त्या वेडसर मयतीच्या पतीला गावकऱ्यांनी हात पाय बांधून घेतले. सदरच्या घटनाबाबत पोलीस मदत केंद्र येरकड येथे पोलीस पाटील व सरपंचांनी संपर्क साधुन आरोपीस धानोरा येथे आणण्यात आले.पत्नीला ठार केलेल्या आरोपीला समस्त गावकऱ्यांनी पोलीस स्टेशन धानोरा येथे स्वाधीन करण्यात आले अधिक तपास धानोरा येथील पोलीस विभाग करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post