जामगिरी येथे वन सप्ताह निमित्त आरोग्य तपासणी शिबिर

चामोर्शी वनपरिक्षेत्र  जामगिरी उपक्षेत्र



वन्य जीव सप्ताह निमित्त मौजा जामगीरी येथे दिनांक ३ ऑक्टोंबर रोजी सकाळी दहा वाजता आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आला. या कार्यक्रमाचे उदघाटन श्री. भैय्या जी वाढई यांच्या हस्ते करण्यात आले.तर अध्यक्ष श्री. सिद्धार्थ गोवर्धन क्षेत्र सहाय्यक जामगीरी हे होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्री. इंगोले सा. व पेंदाले मॅडम हे होते. दिवसेंदिवस पशू, पक्षी व वन्यप्राणी नामशेष होत आहेत त्यांच्या विषयी ओढ निर्माण व्हावी, वन्यप्राणी व मानव संघर्ष वाढत गेला असून त्यासाठी नागरिकांनी जंगलात जाणें टाळावे. शेतावर ऐकटे जावू नये. वन्यप्राणी वाघ, बिबत दिसल्यास वनविभागाला कळवावे. वन्यप्राणी ची शिकार करू नये आणि प्राणी,पशू,पक्षी याविषयी प्रेम निर्माण करावे. आणि हे सर्व करत असताना आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे त्यासाठी हा एक सामाजिक उपक्रम राबविण्यात आला आहे.असे मौलिक विचार क्षेत्र सहाय्यक श्री . सिद्धार्थ गोवर्धन यांनी व्यक्त केले.
    आरोग्य तपासणी करीता बहुसंख्य गावकरी लोकांनी याचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे संचालन श्री. बी. डी.नागोसे वनरक्षक, जामगिरी यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अझर शेख व.र. श्यामनगर, निखिल गावडे व. र. नारायणपूर, शारदा तोमरलावार व. र. विष्णूपूर , शेडमाके सिस्टर, कोमावार सिस्टर, कोडापे आरोग्य सहाय्यक, आशा ठाकूर, वंदना वाढई आणि शारदा महीला मंडळाच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post