दिक्षाभुमी चंद्रपूर येथे धम्मसंध्या गीतांनी दुमदुमला परिसर : आनंद शिंदे यांनी सादर केली भीमगीते


आनंद शिंदे यांनी सादर केली भीमगीते
चंद्रपूर :- येथे धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्ताने 16 ॲक्टो रोजी सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारे दीक्षाभुमि येथे धम्मसंध्या गितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुप्रसिध्द पार्श्वगायक आनंद शिंदे यानी भीमगीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विशेष म्हणजे दोन वर्षानंतर झालेल्या कार्यक्रमात भीमगीतांच्या आवाजाने परिसर दुमदुमला.वंदन गीताने कार्यक्रमाची सुरवात झाली.
पार्श्वगायक आनंद शिंदे यांनी ‘फुले , कबीर, शाहू इनका नाम लेता हु’ या गीताने सुरवात केली. यानंतर ‘ तु इतकं दिलं आम्हाला, हे कधी सरावं....तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं’ आणि ‘कायदा भीमाचा.....किती शोभला असता भीम माझा टाय आणि कोटावर’ हे गीत सादर करताच नागरिकांनी ‘वन्स मोर’ ‘वन्स मोर’ ची मागणी केली.



यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आनंद शिंदे यांचे या पवित्र भुमीत स्वागत करून त्यांना भेटवस्तू दिली. तसेच आनंद शिंदे यांचा भारदस्त आवाज, त्यांची शैली, शब्दरचना याला माझा सलाम, असे म्हणून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यानी आनंद शिंदे यांच्याबद्दल गौरवोद्वार काढले.या कार्यक्रमाला आनंद शिंदे यांचे तीन दशक पूर्वीचे चंद्रपुर चे मित्र शायर, गीतकार सय्यद रमजान अली " घायल" व गड़चिरोली चे मित्र मुन्ना भाई पार्श्वगायक आनंद शिंदे सोबतच होते.
या कार्यक्रमाला सुधाकर भालेराव, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे अधिकारी श्रीराम पांडे, जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, एडवोकेट राहुल घोटेकर ,गुर्नुले , राहुल पावडे,अंजली घोटेकर,सुभाष कासन गोट्टूवार ,शीला चव्हाण, छबु वैरागडे,शेंडेजी,राजेश रंगारी यांच्यासह दीक्षाभुमिवर मोठ्या संख्येने बौध्द बांधव उपस्थित होते.



जिला प्रशासनाने सुद्धा या कार्यक्रमसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या. तसेच या कार्यक्रमाला चंद्रपुर चे पोलिस अधीक्षक अरविंद साल्वे , यांचे मार्गदर्शनात जो बंदोबस्त लावण्यात आला होता तो बंदोबस्त यशस्वीरित्या पार पाड़न्यासाठी उप विभागीय पुलिस अधिकारी सुधीर नंदनवार ,रामनगर चे पुलिस निरीक्षक राजेश मुड़े यानी मोलाची कामगिरी केली पी. आई.धुले, कोंडावार सह सर्व पोलिस बांधवानी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अथक परिश्रम घेतले.चंद्रपुर शहर महानगर पालिका चे आयुक्त विपिन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात समस्त महानगरपालिका अधिकारी व कर्मचार्यानी आवश्यक सोई सुविधा पूर्वित परिसर स्वच्छ ठेवन्याकरिता अथक परिश्रम घेतले.अनेक सेवाभावी संस्थानी भोजनदान चहांदान करुन सेवा केली.
लाखोंच्या संख्येने बौद्धधम्म बांधव हजर होते.अत्यंत उत्साह व आनंदात दोन दिवसीय कार्यक्रम पार पडले.

Post a Comment

Previous Post Next Post