12 वर्षाच्या मुलाचा जीव घेऊन रक्त प्यायली

बरेली
बरेली : अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेल्या एका महिलेने मुल होण्यासाठी शेजारच्या बारा वर्षीय मुलाची हत्या केली. त्यानंतर या महिलेने विकृतीचा कळस गाठत त्या मुलाचे रक्त प्यायल्याची घटना उत्तर प्रदेशात घडली आहे.
या महिलेला बरेली न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.


अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील विनोद शुक्ला यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, हा फार भयंकर अपराध आहे. या विकृत महिलेने त्या मुलाची हत्या करण्यापूर्वी त्याचे रक्त काढले. थोडे चेहऱ्यावर पसरवले आणि काही थेंब ती प्यायली. तिने तपास अधिकाऱ्यांच्या चौकशीत सांगितले की, तिच्या लग्नाला सहा वर्ष उलटली तरी तिला मुल होत नव्हते.

डॉक्टरी उपचार करुनही काही झाले नाही. तिला मुल होत नसल्याने ती सतत काळजीत असायची. लोकांच्या प्रश्नांना उत्तर देऊन ती थकली होती. अखेर तिने एका साधूबाबाची मदत घेतली. त्याने तिला मुल होण्यासाठी एक उपाय सांगितला. त्याने एका अल्पवयीन मुलाची हत्या करुन त्याचे रक्त प्यायल्याने मुल होणार असल्याची हमी दिली. मुल होण्याच्या आशेने या महिलेने एका 12 वर्षाच्या मुलाचा जीव घेतला. या कृत्यात महिलेचा प्रियकर आणि चुलत भावाने हत्या करण्यात मदत केली.
बुधवारी बरेली न्यायालयाने आरोपी महिलेला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर या गुन्ह्यात मदत करणारा तिचा प्रियकर आणि चुलत भावाला आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली आहे, तसेच तिघांना 5 हजारांचा दंड ठोठावला आहे

Post a Comment

Previous Post Next Post