भाऊ दारू कशी लागते गा.. असे म्हणत 24 हत्तींनी मोहाची दारू पिऊन गेले गाढ झोपेत

ओडिशाच्या जंगलात 24 हत्तींचा कळप मोहाची दारू पिऊन अनेक तासांकरता गाढ झोपी गेला. नजीकच्या एका गावातील लोक मोहाद्वारे दारू तयार करण्यासाठी जंगलात पोहोचल्यावर त्यांना हा प्रकार समजला. हत्तींच्या कळपाने मोहाच्या फुलांचे पाणी प्राशन केले होते. ग्रामस्थांनी या हत्तींना जागे करण्याचा भरपूर प्रयत्न केला, परंतु त्यांना यात यश आले नाही. अखेरीस त्यांनी ड्रम वाजवून हत्तींना जागे केले आहे.


ओडिशाच्या केओनझार जिल्हय़ात शिलीपदा गावातील लोकांनी जंगलामध्ये मोठय़ा मडक्यांमध्ये मोहाची पाणी पाण्यात भिजवत ठेवली होती. या मोहाच्या फुलांद्वारे मद्य तयार केले जाणार होते. ग्रामस्थ पहाटे या ठिकाणी पोहोचल्यावर 24 हत्ती तेथेच झोपी गेल्याचे त्यांना आढळून आले.

मोहाची फुले ठेवलेली सर्व मडकी फुटलेली होती आणि पाणी गायब होते. हत्ती हे मद्ययुक्त पाणी पिऊन झोपी गेल्याचे लोकांच्या ध्यानात आले. ग्रामस्थांनी हत्तींना उठविण्याचा प्रयत्न केला, परंतु ते जागे झाले नाहीत. यानंतर वनविभागाला माहिती देण्यात आली. वन विभागाचे पथक तेथे पोहोचल्यावर हत्तींना जागे करण्यासाठी ड्रम वाजविण्यात आले. मग हत्ती जागे होत जंगलात निघून गेले. हत्तींनी मोहाच्या फुल युक्त पाणी प्यायल्याचा वन विभागाला संशय आहे.

Post a Comment

Previous Post Next Post