कॉग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पदयात्रेचे स्वागत

कॉग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पदयात्रेचे स्वाग
 
 
आमचे पत्रकार बंधू रायगड जिल्ह्यातील गोर गरिबांचेवाली धम्मशील सावंत यांनी,या देशभर गाजणाऱ्या पदयात्रे बद्दल माझी प्रतिक्रिया मागितली.मी नेहमीच ठाणे रायगड पालघर मुंबई च्या आगरी कोळी भंडारी ईस्ट इंडियन,कराडी,आदिवासी आणि ओबीसी बांधवाच्या प्रश्नावर बोलायचे व लिहायचे ठरविले आहे. तेव्हापासून मी माझी व्यक्तिगत मते बाजूला ठेऊन माझ्या समाजाचे प्रश्न म्हणूनच प्रतिक्रिया देत आलोय.त्यामुळे एव्हढ्या मोठ्या लोकसंख्येची भावना कमी शब्दात कशी मांडणार?.म्हणून ही सविस्तर प्रतिक्रिया देत आहे.
      कॉग्रेसने देशाच्या स्वातंत्र्यासाठी भारताच्या इतिहासात मोठे जन आंदोलन चालविले आहे.त्यामुळे भारतात कोणताही कॉग्रेस कार्यकर्ता एक तत्वज्ञान अभिमानाने सांगू शकतो ते विचार महात्मा गांधी यांचा "गांधी विचार" म्हणून साऱ्या जगभर मान्यता पावलेले अहिंसक लोकशाही विचार आहेत.अर्थात चातुर्वर्ण्य समाज व्यवस्थेचे समर्थक महात्मा गांधी हे भारतीय संविधान निर्मात्या,स्वातंत्र्य समता बंधुता न्याय ही जीवन मूल्ये माननाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या हिमालयाच्या उंचीच्या महापुरुषासमोर,पुण्यातील पर्वतीच्या टेकडी एव्हढे खुजे आहेत.
    डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे संविधान यांची अंमलबजावणी कॉग्रेसने तंतोतंत केली असती तर भाजपला येथे पाय रोवता आलेच नसते.आज भाजपाने अनैतिक ईव्हीएम मशीन द्वारे लोकशाही संपविली असताना लोकसभेत राष्ट्रीय विरोधी पक्ष म्हणून कॉग्रेस अपेक्षित प्रतिकार करू शकली नाही.आंधळ्या धृतराष्ट्रासमोर असहाय्य द्रौपदी (लोकशाही) ची साडी खेचणाऱ्या पुरुषसत्ताक मनुवादी भाजपच्या दुर्योधनाने, देशातील समस्त स्त्री शूद्राती शूद्र या 85 टक्के मागासवर्गीय जनतेच्या अधिकारांना हात घातला आहे.हे मनाने पराभूत गुलाम लाचार झालेल्या कॉग्रेसच्या भीष्माचार्य नेतृत्वाला कधी कळले नाही.
85 टक्के मागास लोकांशी प्रामाणिक राहण्याची नीती मागच्या सत्तर वर्षात कॉग्रेसने गमावली आहे.
    चातुर्वर्ण्य समाज व्यवस्था समर्थक भारतीय संत महात्मे हे वादळात उडणाऱ्या धुळीसारखेच आहेत.त्यातून देशात समता कधीच येत नाही.आली नाही.त्यांचे काम पुन्हा पुन्हा मनुस्मृतीचे सरकार मजबूत करणे हेच असते. ही हिंदू वैदिक महात्मा संत बुवा बापू नाना परंपरा,महात्मा गांधींनी अधिक मजबूत केली आहे.ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांना आदर्श मानून भारतात जे जे महात्मा देव ईश्वर प्रेषित झाले त्यांना मान सन्मान सत्ता प्रतिष्ठा धार्मिक मान्यता सारे काही मिळते हे वास्तव लपून राहिलेले नाही.शोषित समूहातील देवदासी म्हणून जन्मलेली गाणसम्राज्ञी जागतिक लोकप्रियता मिळूनही हिंदू चातुर्वर्ण्य समाज व्यवस्थेचा चक्रव्यूह भेदू शकली नाही.
   कॉग्रेसच्या मनुवादी भाजपा समोरील ऐतिहासिक अपयशाचे हेच आणि असेच काहीसे कारण आहे.स्वातंत्र्यपूर्व काळात रायगड जिल्ह्यातील सारे खोत सावकार हे कॉग्रेसचे नेते होते.अर्थात ते ब्राह्मण मराठा उच्चवर्णीय जमीनदार होते.त्यांच्या विरोधात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आगरी कोळी कराडी भंडारी कुणबी या भूमिहीन मागासवर्गीय कुळांचे नेतृत्व केले.यातून जमीन कसणाऱ्या गरीब कुळांच्या अधिकारात कुळ कायदा 1 एप्रिल 1957 साली तयार झाला.यात कायद्यांची मांडणी आंदोलन संघर्ष हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर, नारायण नागु पाटील यांचे असताना तो कायदा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बनविला असा प्रचार कॉग्रेसने केला.
    श्रेयाच्या या कॉग्रेसी राजकारणात लोकांना न्याय देण्याचा प्रामाणिक पणा आजही कॉग्रेस नेतृत्वात नाही.ही सिद्ध झालेले गोष्ठ,सत्य असल्यामुळे महाराष्ट्र कॉग्रेस आजही जमीनदार सरंजामी खोत सावकारांची मराठा ब्राह्मण शेटजी भटजी संघटना झाली आहे.कुळ कायद्याची अंमलबजावणी थांबण्याचे सर्वात मोठे कारण ब्राह्मण मराठा जातींचे जिल्हाधिकारी,तहसीलदार, महसूल मंत्री मुख्यमंत्री हेच आहेत.आज मुंबई ठाणे रायगड पालघर रायगड येथील आम्हा ओबीसींच्या सर्व शेतजमिनी लुटून खाल्या नंतर कोळीवाडा गावठाण यांचे जमीन मालकी हक्क नाकारणारे सर्वात जास्त मराठा महसूल मंत्री कॉग्रेसनेच दिले आहेत.राहुल गांधी यांनी याचा अभ्यास करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील चरी अलिबाग येथील जागतिक विक्रमाची ओळख असलेल्या शेतकरी संपाच्या ठिकाणास भेट द्यावी.या देशात पिण्याचे पाणी नाकारणाऱ्या ब्राह्मण मराठा कॉग्रेस पुढाऱ्यांच्या महाड चवदार तळ्याचा क्रूर लाजिरवाना इतिहास पहावा.
   रोहिणी नदीच्या पाण्याच्या संघर्षात कोलीय शाक्य यांचा रक्तपात टाळण्यासाठी वंशपरंपरागत आलेले राज्य त्यागणार्या एकविरा पुत्र बुद्धांचा त्याग पहावा.मराठा ब्राह्मण या उच्चवर्णीय लोकांनी मनुस्मृती नुसार पाणी नाकारले म्हणून अस्पृश्याना आपली विहीर मोकळी करणाऱ्या महात्मा फुले पहावेत.ब्राह्मणी सारस्वतींने नाकारलेले शिक्षण आम्हा मागास वर्गीयाना मुक्तहस्ते वाटणारी ज्ञानज्योति सावित्रीमाई पहावी.पदयात्रा तर महात्मा गांधींनीही केली.कशासाठी सत्ता उच्चवर्णीय लोकांच्या हाती देण्यासाठी?.मिठाचा कायदा मोडण्यासाठी आंदोलन केले.आगरी कोळी भंडारी लोकांची कसत असलेली मिठागरे टाटा आणि अदानी अंबानी सेझ ला देण्यासाठी?
चातुर्वर्ण्य जात पात स्त्री पुरुष वंशभेद यांनी नासलेल्या हिंदू वैदिक धर्मातील कर्मकांड पशुहत्या थांबविण्यासाठी बुद्ध महावीर यांनी क्षत्रिय राजेशाही नाकारून समता न्याय बंधुता करुणा प्रज्ञा शील ही जीवन मूल्ये देशासाठी नाही साऱ्या जगातील मनुष्यजातीला देण्यासाठी पदयात्रा काढली.नव्हे पायी चालत श्रमण पद्धतीने अन्नदान घेऊन जेवून घरा घरातील दुःख जाणून, ते त्याच्या कारण कार्यकारण भाव याचे विज्ञान लोकांना समजावून संपविले.ते पायी चालणे बुद्ध महावीर यांच्यासम व्हावे.तुमच्या समोर हिंदू धर्मात गौरविलेल्या पवित्र गंगेला कोरोना काळात "शववाहिनी "गंगा म्हणून नवा हिटलरी मनुष्य वधाचा, प्रेतयात्रेचा शहेनशहा म्हणवून घेणाऱ्या पांढऱ्या दाढीवाल्या बाबांचं आव्हान उभे आहे.
    भारताच्या संविधान सभेत रक्त आटवून,घसा फोडून तासनतास जागतिक दर्जाचे बौद्धिक युक्तिवाद,चर्चा करून आणलेली समता न्याय सांगणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर कुठे? आरक्षणाला मनुस्मृती, हिंदू धर्म त्यातील कुप्रथा स्त्रीया शूद्र अतिशुद्र यांचे शोषण करणाऱ्या श्रीमंत पेशवे राजे रजवाडे क्षत्रिय ब्राह्मण वैश्य याना लोकसभे समोर नाक घासून विषमता आणि समता समजवणारे संविधानकार आणि इतर कॉग्रेस खासदार कुठे ?.आज मागासवर्गीय 85%भारताची लूट हिंदू धर्माचा टिळा लावून करणाऱ्या,ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांना सवर्ण गरीब म्हणवून जगात कुठेही नसलेले शिक्षण नोकऱ्यातील आरक्षण देणारे मोदी सरकार,काळाने नालायक ठरविले?तरीही हे सवर्ण 10 टक्के आरक्षण समता सांगणाऱ्या सविधाना समोर चक्क बरोबरच आहे.असा सुप्रीम न्याय देणारे भारतीय न्यायमूर्ती जे पाचही ब्राह्मण आहेत. ते जागतिक मानवी न्यायिक इतिहासात बदनाम झालेत.
  लोकसभा राज्यसभा न्यायमंदिर प्रशासकीय कार्यालये पत्रकारिता यात भाजप सरकार वाईट झाले म्हणून कॉग्रेस चांगली योग्य आहे असे होत नाही.चांगले कोणवाईट कोण ?याची व्याख्या भारतीय संविधान आणि भारतीय जनता ठरविते.कॉग्रेसने केलेली एक चागली गोष्ठही सांगतो.
   आज भारतीय संविधानाने शिक्षण नोकऱ्या यात मागे राहिलेल्या ओबीसी एससी एसटी यांचे आरक्षण सवर्ण आरक्षण देऊन संपविले.मंडल आयोगाने या देशात समता प्रस्थापित करण्यासाठी केवळ शिक्षण सरकारी नोकऱ्या ध्या,असे म्हटले नव्हते.तर ब्राह्मण मराठा जमीनदार यांच्याकडे एकवटलेली जमीन पाणी उद्योग व्यवसायात समान भागीदारी वाटा ध्या.असे म्हटले आहे.अर्थात 85 टक्के मागासवर्गीय लोकांचा देशाच्या साधन संपत्तीतील वाटा हा देश व्यापणारा विषय आहे.सरकारी भु संपादनात उरण रायगडच्या सिडको भूसंपादन प्रक्रियेत मराठा वसंतदादा पाटील हा सरंजामी मुख्यमंत्री आमच्या आगरी कोळी कराडी ओबीसींवर बंदुकीच्या गोळ्या घालतो.आमची पाच माणसे मारतो,हजारो जखमी करतो.या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या लोकनेते दि बा पाटील यांच्या घरास आपण भेट ध्या.
   आमच्या या राष्ट्रीय नेत्याने 1984 साली साडे बारा टक्के पुनर्वसनासाठी जे विकसित भूखंडाचे तत्व मांडले.त्याचा आधार घेऊन मा जयराम रमेश,मा भालचंद्र मुणगेकर,कॉग्रेस अध्यक्षा आदरणीय आई सोनिया गांधी आणि अन्य नेत्यांनी नवा भूसंपादन कायदा 2013 साली बनविला.देशातील भूमिहीन आदिवासी ओबीसी एससी एसटी यांना अगदी सागर नदी तलाव येथील मच्छीमार यांना न्याय देणारा मानवी चेहरा असलेला लोक कल्याणकारी कायदा भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसने तयार केला.तो देशासाठी गौरवास्पद आहे.
   महाराष्ट्रातील सरंजामी मराठा ब्राह्मण नेतृत्वाने हा कायदा लोकांना सागितलाच नाही.
रायगड पालघर ठाणे मुंबई कोकण परिसरातील आगरी कोळी भंडारी कराडी ओबीसी कॉग्रेसी वर्तमान नेतृत्वाने "कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ" याप्रमाणे आम्हास फसविले आहे.आज छत्रपती शिवराय असते तर या रायगडच्या चोरांना अंधार कोठडी दिली असती.राहुलजी या कायद्यांची अंमलबजावणी नवी मुंबई विमानतळ प्रकल्प,समुद्रावरील कोस्टल रोड प्रकल्प ,उरणच्या वर्तमान सिडको भूसंपादन प्रक्रियेत होत नाही.चर्मकार मातंग बौद्ध कराडी आगरी कोळी यांचे सुंदर कोकण तोडले जात आहे.मी आज सायंकाळी बाळइ उरण रायगड येथे ही सभा ठेवली आहे.
 माझी विनंती आहे सर्वपक्षीय दलाल नेते शेतकऱ्यांना मूर्ख बनवीत असताना,किमान कॉग्रेस नेत्यानी यात भाग घेऊ नये.असे आदेश आपण कॉग्रेस कार्यकारणीस दिले आणि ते कोकणातील कॉग्रेस नेतृत्वाने ऐकले?.तर मी आपले अभिनंदन करण्यासाठी उरणच्या शेतकऱ्यांना घेऊन नक्कीच येईन आपला हितचिंतक!
जय भारत.
सुलोचनापुत्र राजराम पाटील 8286031463
मातृसत्ता विहार,केगाव खारखंड,उरण जिल्हा - रायगड.

Post a Comment

Previous Post Next Post