महामंडळवर 7/12 ऑनलाईन करण्याची तारीख 30/11/2022 पर्यंत अखेर वाढली

गडचिरोली:- खरीप पणन हंगाम २०२२-२३ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्ग धान व भरडधान्य खरेदीकरिता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरिता, दि. १०.११.२०२२ अखेरपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. तथापि, ऑनलाईन पोर्टलवरील माहितीनुसार, मागील हंगामांचा विचार करता शेतकरी नोंदणी पुरेशी झालेली नसल्याचे दिसते.






२. सदर बाबीचा विचार करता, आपणास कळविण्यात येते की, पणन हंगाम २०२२-२३ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्ग धान व भरडधान्य खरेदीकरिता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरिता, दि.३०.११.२०२२ अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. चालू हंगामामध्ये पुरेशा प्रमाणावर शेतकरी नोंदणी व्हावी, याकरिता यापूर्वी सूचित केल्यानुसार, आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदी करिता नोंदणी सुरु झाल्याबाबत व्यापक प्रमाणावर प्रसिद्धी देण्याची कार्यवाही करावी असे आदिवासी महामंडळाने कडविले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post