बेजबाबदार अजितदादा आणि फडणवीस!

बेजबाबदार अजितदादा आणि फडणवीस!


रोगराई,दुष्काळ, अतिवृष्टी, युद्ध अशी संकटे येत राहातात. त्यातून मार्ग काढण्याचा मानव प्रयत्न करीत असतो.यशस्वी होतो. म्हणून तर टिकून आहे.घाबरला असता तर कोलमडला असता.आणि आज इतकी लोकसंख्या झाली नसती.आयुष्यमान इतके वाढले नसते.ईश्वराने निर्मिती केली तरी ती टिकवून ठेवण्यात मानवाचा प्रयत्न असतो.तसा प्रयत्न या रोगराई काळात केला जात आहे.यातूनही मानव सही सलामत सुटेल.यश येत आहे.
संकटाशी मुकाबला चालू आहे. ज्याला जमेल त्या परीने.कोणी औषधाने.कोणी अलिप्त राहून.
    अलिप्त राहाणे खूप चांगला प्रतिबंधक उपाय आहे. उपचार त्याहून कष्टदायक आहे.म्हणून लॉकडाऊन पाळणे सोपे आणि तितकेच आवश्यक आहे. पंदरा दिवस नाही काही केले तरी आहे त्यावर गुजारा होतो.पण माणसाचा हावरटपणा त्याला शांत बसू देत नाही. तो शेजारचा झोपला आहे तोपर्यंत आपण कमवून घेऊ,ही प्रवृत्ती माणसाला चूप बसू देत नाही. तो लॉकडाऊन मधे अडकला आहे,तोपर्यंत आपण हात मारून घेऊ ,ही प्रवृत्ती वाईट आहे.
       पंढरपूर ला आमदार मेला. असे तर अनेक मेले. पुन्हा बनले.आता अशा लॉकडाऊन परिस्थिती मधे नाही निवडणूक घेतली असती तर विधानसभा बंद पडली असती का?मुंडे,राठोड,बाळासाहेब पाटील रात्री ९ नंतरही विधानसभा चालवत असतील का?असे अनेक आमदार असून नसून सारखेच आहेत.खायला चारा अन भुईला भारा !
      काहीं पुढाऱ्यांचा रहमानी किडा वळवळ करतो. घेतलीच निवडणूक तर राष्ट्रवादी ला किंवा भाजपला एक सीट मिळाली नसती तर काय बिघडले असते? पण अजितदादा ,फडणवीस ही माणसे ,ज्यांना रोज मुख्यमंत्री व्हायची घाई असते ते तेथे गर्दी करीत होते.लोकांना गर्दी करायला कार्यक्रम घेत होते.हे तर सर्रास चुकीचे आहे.ही माणसे बेजबाबदार आहेतच.अधाशी,मतलबी आहेतच.खोटारडी आहेतच.कारण एक आमदार जास्त मिळवून फडणवीस मुख्यमंत्री होणार आहेत का? असे ही पांच वर्ष मुख्यमंत्री होतेच.कोणते कोयना ,सतलज बांधून टाकले? कोणते भेल किंवा अणुभट्टी चालू केली? तसेच अजितदादा पवार. जन्माला आले तेंव्हापासून आमदार आहेत.मंत्री आहेत.नको ते खाते घेतले आणि खाऊन टाकले.मंत्री बनूनही असे कोणते दिवे लावले कि शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळायला लागली? तर मग पंढरपूर चा एक आमदार मिळवूनही कोणते लंडन,बेळगाव जिंकणार होते? पण हावरटपणा जात नाही. एक दाणा कच्चा राहून गेला तरी हागलेले घरी घेऊन यायची तयारी.म्हणे कुत्र्याला खाऊ घालण्यापेक्षा आपणच....?लोक बिचारे लॉकडाऊन मधे आणि हे सैराट!कुठेतरी हात आवरता घेतला पाहिजे. मनाला लगाम घातला पाहिजे. त्यागाची भुमिका घेतली पाहिजे.म्हणे पुरोगामी महाराष्ट्रात राहातो.तरीही इतका हावरटपणा?म्हणे गांधी नेहरू मानतो.आणि इतके खिसे ?फाटेस्तोवर ?
     चाळीसगाव चा शेतकरी वीजकनेक्शन साठी आंदोलन करतो.तेथे हे पुढारी आले नाहीत. म्हणे कोरोना होईल.कांदा अनुदान प्रश्नासाठी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समीतीत आले नाहीत. म्हणे कोरोना होईल.पण एक आमदाराच्या निवडणूक प्रचारात कोरोना होत नाही. हे कोणत्या नितीत बसते?निवडणूक जिंकायची.सत्ता मिळवायची.तिजोरी लुटायची.इतकेच ध्येय असेल तर अशा पुढाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे.
    अशा हावरट राजकीय माणसांना कसे पुढारी मानावे? कसे नेते मानावे? गंभीर प्रश्न आहे.जो गंभीर आणि खंबीर असेल त्यालाच कळेल.

....शिवराम पाटील.
9270963122.
जळगाव जिल्हा जागृत जनमंच.

Post a Comment

Previous Post Next Post