मालेवाडा येथे आतर महाविद्यालय खो-खो पुरुष स्पर्धा*


एजाज पठाण प्रतिनिधि 


गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत ॲड. विठ्ठलराव बनपुरकर मेमोरियल कला व वाणिज्य महाविद्यालय मालेवाडा येथील भव्य खेळाच्या मैदानात आंतर महाविद्यालयीन खो-खो पुरुष स्पर्धेचे उद्घघाटन आज दिनांक ४/११/२०२२ रोज शुक्रवारला डॉ. प्राचार्य जे. व्ही. दळवे, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय लाखांदूर यांच्या हस्ते प्राचार्य डॉ. एच. एम. कामडी यांच्या मार्गदर्शनात पार पडला. या उद्घघाटन समारंभाचे अध्यक्ष मा. सारंगजी बनपूरकर, सचिव, संजीवनी आदिवासी जाती व मागासवर्गीय शिक्षण संस्था खरमतटोला, प्रमुख अतिथी सौ अनुसया पेंदाम सरपंच, ग्रामपंचायत मालेवाडा, मा. सुधाकर जी भरणे सदस्य, महाविद्यालय विकास समिती मालेवाडा, डॉ. ठाकरे, डॉ. अर्मरकर, डॉ. चाऊके यांच्या उपस्थितीत आज उद्घघाटनाचा सोहळा पार पडला.





 उद्घघाटनाच्या प्रसंगी प्रा. हिवराज राऊत, डॉ. वैद्य, डॉ.पल्लवी काळे, प्रा. रामटेके, प्रा. कन्नाके, प्रा. कुंमरे, प्रा. लोहम्बरें, प्रा. नरेश आत्राम, डॉ. वर्षा ठाकरे, प्रा. आष्टीकर, प्रा. हेमलता बावनथळे प्रा.कु.छाया बनसोड, उच्च लिपिक श्री हिरामण उईके , श्री देवेंद्र शेलोकर, श्री दीपक बनपूरकर, श्री मनोज समर्थ , श्री राहुल वालदे, श्री अविनाश जांभुळे, श्री गोपाल करमरकर तसेच वॉलेंटियर व आंतर महाविद्यालयाचे खो-खो खेळाडू व महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एच.एम. कामडी व सूत्रसंचालन प्रा. कु. हेमा कराडे हिने केले तर आभार प्रा. डी. एम. नंदेश्वर यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post