बेलापूर येथे आगरी कोळी कोकण संस्कृती महोत्सव दिमाखात साजरा



विरेंद्र म्हात्रे नवी मुंबई : दरवर्षा प्रमाणे यावर्षी देखील नवी मुंबई बाळासाहेबांची शिवसेना प्रभाग 39 पुरस्कृत शिवतेज मित्र मंडळ तर्फे बेलापूर येथील सी. एन. जी. पेट्रोल पंप शेजारील मैदानावर मुख्य मंत्री एकनाथ जी शिंदे. शिवसेना नेते विजय नाहटा.शिवसेना नेते विजय चौगुले यांच्या मार्गदर्शना खाली आगरी कोळी कोकण संस्कृती महोत्सवाचे दिनांक 4 नोव्हेंबर 2022 ते 20 नोव्हेंबर 2022 या कालावधीत सायंकाळी 5 ते रात्री 10 या वेळेत उप शहर प्रमुख श्री विशाल कोळी. महिला उप शहर संघटक सौ. तेजस्वी ताई विशाल कोळी. उप शहर प्रमुख श्री रामा दादा कोळी यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. आज दिनांक दिनांक 20 नोव्हेंबर 2022 रोजी या महोत्सवा ची सांगता सांस्कृतिक कार्यक्रमाने व पारितोषिक वितरण कार्यक्रमा ने झाली. 
 या महोत्सवात विविध प्रकारचे स्टोल . तसेच पाळणी. सोबत आगरी कोळी लोकांच्या पसंदी चे जेवणा चे स्टोल. या खेरीज दर दिवशी श्रीकांत मुंबईकर प्रस्तुत कला सागर. लावणी.जलोष. गौरव महाराष्ट्राचा. चिंतामणी अकॅडमी प्रस्तुत ऑर्केस्ट्रा. स्टेप आर्ट प्रस्तुत जल्लोष सुवर्ण युगाचा. डी महेश खेळ पैठणीचा हा कार्यक्रम झाला. यामध्ये प्रथम क्रमांक सौ. रेखा. मनोहर मोहन. द्वितीय सौ. स्वेता संदेश पाटील. तृतीय. सौ. रेशमा पंकज पाटील यांना पैठणी साडया देऊन सन्मानित करण्यात आले. .सांस्कृतिक कार्यक्रम सोबत आरोग्र शिबीर तसेच दिनांक 11 नोव्हेंबर 2022 रोजी संस्थापक शिवतेज मित्र मंडळ बेलापूर श्री विशाल कोळी यांच्या वाढदिवसा निमित्त साई भंडारा चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सव दरम्यान शिवसेना नेते विजय चौगुले.. उपनेते विजय नाहटा.श्री रोहिदास पाटील.सौ. सरोज पाटील. श्री निळकंठ म्हात्रे. आदी सह मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.  
 सदर महोत्सव यशश्वी करण्यासाठी शिवतेज मित्र मंडळ संस्थापक विशाल कोळी. अध्यक्ष भूषण मोरे. सेक्रेटरी श्री रामा दादा कोळी. उप सेक्रेटरी पांडुरंग बिरादार. खजिनदार प्रकाश आमटे. सचिव नागेश पाटील. उप खजिनदार धवल जैन. सह सचिव मंगेश रामा कोळी... वेदांत विशाल कोळी.. गणेश म्हात्रे. आदी सह उप शहर संघटक तेजस्वी विशाल कोळी. सुनंदा रामा कोळी. विभाग संघटक सविता पाटील. शाखा संघटक वैशाली प्रकाश आमटे. बबन बाबर. इंगळें मॅडम. राजेश्री भोरे अर्चना बिरादार. मनीषा बाबर. अविना म्हात्रे.. वेदांती कोळी. प्राची कोळी. नियती पाटील ऍड. मानसी कोळी आदी सह युवा कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

Post a Comment

Previous Post Next Post