मोहझरी येथे नागरी लाभ वितरण प्रणाली कार्यक्रम अंतर्गत सर्वे करण्यात येत आहे

मोहझरी:-  येथे नागरी लाभ वितरण प्रणाली कार्यक्रम अंतर्गत सर्वे करण्यात येत आहे



सर्व सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार गडचिरोली जिल्ह्यामध्ये संपूर्ण गावामध्ये नागरिक लाभ वितरण प्रणाली हा कार्यक्रम राबवून प्रत्येक गावातील नागरिकांची माहिती कोतवाला मार्फत गोळा करून सर्वेचे काम सुरू आहे. सदर कोतवाल बाकी काम बाजूला ठेवून या सर्वेच्या कामांमध्ये व्यस्त असल्याचे दिसून येत आहेत. 



त्यामुळे अशा कमी वेतनामध्ये सुद्धा कोतवाल आपले कार्य योग्यरीती पार पाडत आहेत. हा सर्वे करण्याचा महत्त्वाचा उद्देश कुटुंबाची एकत्रित माहिती गोळा करणे तसेच कोणत्या कुटुंबाला कोणता योजनेचा लाभ मिळाला, त्यांच्याकडे कोणते कागदपत्रे आहेत इत्यादी माहिती गोळा करण्यासाठी नागरिक लाभ वितरण प्रणाली अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा उपक्रम जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राबविल्या जात आहे. या उपक्रमाचा लाभ अनेक नागरिकांनी घेतला.

Post a Comment

Previous Post Next Post