कढोली येथील संजय विश्वनाथ मानकर ग्रामपंचायत सफाई कामगार यांचे अचानक निधन

कढोली:- प्राप्त माहितीनुसार कुरखेडा तालुक्यातील कढोली येथील संजय विश्वनाथ मानकर वय 32 ग्रामपंचायत सफाई कामगार यांचे आज सायंकाळी सहा वाजता अचानक निधन झाले.

संजय विश्वनाथ मानकर हे अविवाहित होते .
त्यांच्या पश्चात दोन भाऊ, आई-वडील, वहिनी असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.

संजय विश्वनाथ मानकर हे अचानक निघून जाण्याने मानकर परिवारावर शोककळा पसरून परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे.

उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत कढोलीच्या वतीने त्यांना भावपूर्वक श्रद्धांजली....💐💐💐💐💐

Post a Comment

Previous Post Next Post