आरएसएस-भाजप युतीमुळे लोकशाही व संविधानाला गंभीर धोका भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी.राजा यांचा आरोप



पाटणा : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आरएसएसप्रणित भाजप सत्तेत आल्यापासून आरएसएस-भाजपाच्या युतीमुळे धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही व संविधानाला गंभीर धोका निर्माण झाल्याचा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी.राजा यांनी केला आहे. पाटणा येथील सीपीआयच्या राज्य मुख्यालयात पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते.


डी. राजा म्हणाले की, केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील आरएसएसचे भाजप सरकार देशाला विनाशाच्या दिशेने घेऊन जात असून संकटात टाकणारी धोरणे ते राबवत आहेत. रुपयाचे मूल्य घसरले आहे. रुपया इतक्या खालच्या पातळीवर पोहोचला आहे की त्यामुळे देशाच्या सन्मानाला धक्का बसत आहे.



आरएसएसप्रणित भाजप सरकार धर्मनिरपेक्ष, कल्याणकारी आणि संघराज्य असलेल्या भारताची राज्यघटना बदलण्याच्या षड्यंत्रात आहे. या सरकारला देशाला जातीयवादी आणि फॅसिस्ट मार्गावर न्यायचे आहे. अनुसूचित जाती, आदिवासी आणि अल्पसंख्याकांवर अत्याचार वाढत आहेत. नागरिकांचे संविधानिक आणि लोकशाही अधिकार पायदळी तुडवले जात आहेत. याविरोधात आवाज उठवायला हवा.

Post a Comment

Previous Post Next Post