तहसीलदाराच्या आशीर्वादाने तालुक्यात अवैध रेती चोरी जोरात...

सत्यवान रामटेके उपसंपादक

सडक अर्जुनी, गोंदिया,:- : सडक अर्जुनी तालुका विविध गौण खनिजाने नटलेला आहे. या तालुक्यातून मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज तस्करीचे राकेट जोमात चालतात. यावर नियंत्रण करण्याचे काम तालुका प्रशासनाचे आहे. मात्र पाहिजे त्या प्रमाणात कार्यवाई केली जात नाही. विशेष म्हणजे अवैध कामे करणारी मंडळी अधिकाऱ्यांच्या क्याबीन मध्ये तासोनतास का ? बसलेली असतात. याचा विचार अनेकांना पडला आहे. तहसील कार्यालयातील सीसीटीवी वरीस्ठानी तपासल्यास सत्य समोर येणार. अवैध वाळू चोरी थांबावी या करिता तालुक्यात नाम मात्र भरारी पथकाची नियुक्ती दिनांक २६.०८. २०२२ रोजी एक आदेश काढून करण्यात आली. त्या अनुसंघाने तालुक्यात कार्यावाई करण्याचे आदेश काढले गेले खरे मात्र कार्यवाई अध्याप सुन्यावारच आहे.

बेल बंडी धारकांना टार्गेट करून कार्यवाई…

विशेष म्हणजे तालुका अधिकार्याला ज्यांच्याकडून हप्ते मिळत नाही. अश्या वाहन धारकांना आणि बेल बंडी धारकांना टार्गेट करून कार्यवाई केली जात अश्ल्याची तालुक्यात चर्चा आहे. मात्र मोठ्या वाळू चोरांवर अध्याप कार्यवाई सुन्यच आहे. विशेष सौन्दड आणि फुटाळा गावातून रोज २५ ट्रकटर तर ५ अवैध ट्रक चालतात. या कामात २ जेसीबी चा वापर केला जाते. पत्रकाराना या बाबाद सविस्तर माहिती मिळते. मात्र जनतेच्या सेवेत रुजू अश्लेले अधिकारी कर्मचारी यांना ही माहिती मिळत नाही का ? हे हास्यस्पद मानले जाते. म्हणजेच तालुक्यातील तालुका तहसीलदार किशोर बागडे यांच्या आशीर्वादाने अवैध गौन खनिज उत्खनन जोमात चालते हे सत्य मानले तरी वावगे ठरणार नाही.

भरारी पथक नाम मात्र… भाजप चे कार्यकर्ते सक्रीय…

भरारी पथकात तब्बल १९ लोकांची कार्यवाई करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. यात पथक प्रमुख नायब तहसीलदार शरद हलमारे तर सहाय्यक पथक प्रमुख सुरेश ठाकरे मंडळ अधिकारी असून अन्य १७ लोक सदस्य आहेत. यापूर्वी नायब तहसीलदार यांनी सांगितले आहे. की तालुक्यात पथक तय्यार असून फायदा नाही. कार्यवाई करण्यासाठी वाहन आणि वाहनात डीजेल उपलब्ध पाहिजे मात्र त्या दोन्ही साधन उपलब्ध नाही. परिणामी कार्यवाई करताना कोणती विपरीत घटना झाल्यास त्याला जबाबदार कोण राहील. म्हणजेच तालुका प्रशासनाला सुधा वाळू माफियांची भीती आहे. तालुक्यात भाजप चे कार्यकर्ते सध्या वाळू चोरी मध्ये सक्रीय आहेत. यांच्यावर कार्यवाई करण्यासाठी अधिकाऱ्यांचे हात थरथरतात का ? असी देखील विचारणा केली जात आहे.

ट्रकखाली चिरडून देण्याची धमकी दिली…

विस्वसनिय सूत्रांनी दिलेल्या माहितनुसार सौन्दड आणि फुटाळा येथील अवैध वाळू माफियांनी पत्रकार बबलू मारवाडे यांना ट्रॅक खाली चिरडून देण्याची धमकी दिली आहे. या पूर्वी देखील पोस्को, अटरासिटी, 353, 354, 376 या सारख्या खोट्या कलमा लाऊन जेल मध्ये फिट करण्याची देखील धमकी दिली आहे. पोलिश विभाग याच्या खिश्यात अश्ल्याचे तो सांगतोय. वारंवार अवैध वाळू चोरी बाबद बातम्या लावल्यामुळे अधिकार्यांना दिलेली रक्कम वाया जाते. तर धंद्यावर परिमाण होते. वाहने मासिक हप्त्यावर घेतलेली अश्ल्याने किस्त थकीत होते. त्या मुळे ही धमकी तालुक्यातून तडीपार असलेल्या त्या वाळू माफियां आणि त्याच्या साथीदाराकडून देण्यात आली आहे. ट्रक खाली चिरडून अपघात दाखउ असे बोलले जात आहे. यावर पोलीस विभागाने देखील लक्ष देण्याची गरज आहे. तालुका प्रशासनाच्या नाकर्ते पनामुळे तालुक्यातून अवैध गौण खनिज चोरी जोमात चालू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post