फोडला रे फोडला सिमेंट रस्ता फोडला मात्र ठेवला जैसे थे


वैरागड:- येथे जळजीवन मिशन अंतर्गत नवीन पाइप लाईन टाकण्याचे काम सुरू आहे..मात्र त्रिरत्न खोब्रागडे यांच्या घरासमोरून गावात जाणाऱ्या काँक्रिट च्या मेन रोड ला फोडून तो तसाच ठेवण्यात आलेला आहे..त्याला बुजविण्यात आलेला नाही..त्यामुळे त्यावरून रोज जड व हलके वाहनांची ये जा होत असल्याने काँक्रिटच्या आत मधून सलाखी 2 फूट बाहेर आलेले आहे..रात्रीच्या वेळी या मार्गावरून वाहन गेल्यास अपघात होण्याची दाट शक्यता असल्याने प्रसंगी जीव गमवावे लागण्याची भीती निर्माण झालेली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने तत्काळ याबाबत दखल घेऊन या रोडची दुरुस्ती करावी अशी मागणी ये जा करणाऱ्या वाहनधारकांनी केलेली आहे..अन्यथा या मार्गावरून ये जा करणाऱ्या वाहनधारकांची अपघात होऊन प्रसंगी जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही..

Post a Comment

Previous Post Next Post