आला रे आला...खैरगांवात अवैध देशी दारू विक्रीचा महापूर

मोवाड पोलीस चौकीचे कर्मचारी लक्ष देतील का? गावकऱ्याचा सवाल ::

राजेंद्र बागडे नागपूर जिल्हा विभागीय प्रतिनिधी ता. 10

नरखेड तालुक्यातील मोवाड पोलीस चौकी अंतर्गत येत असलेले खैरगांव गावात बाजारात,चौकात, बसस्थानक, शाळेतील, परिसरात अशा अनेक ठिकाणी अवैध देशी दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरु आहे.यापासून नागरिक व युवा तरुण वर्ग व्यसनाधिंन होऊन गेले आहे. पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. विक्री मालकांना पोलिसांचे अभय असल्याचेही या गावात ठिकठिकाणी चर्चा होत आहे. अनेक ठिकाणी अवैध देशी दारू विक्रीचे अड्डे या गावात बनले आहे तर शाळेतील परिसरात सरार्स अवैध दारू विक्री होत आहे येथे असलेले शासकीय परवाना धारक दुकानाची काही वेळ नाही कधीही या आणि कधीही घेऊन जा असा गोरखधंदा खैरगावात पावावयास मिळत आहे याकडे मात्र पोलीस कर्मचाऱ्यांचे कोणतेही लक्ष नाही.जरी पोलीस कर्मचाऱ्यांचे लक्ष असले तरी अवैध देशी दारू विक्री बंद का करत नाही असा प्रश्न येथील खैरगावातील सुद्य नागरिकांनी व्यक्त केला आहे.विक्री मालक आणि पोलीस यांच्यात आर्थिक साटेलोटे असल्याशिवाय ही अवैध देशी दारू विकल्या जातं नाही पोलीस त्याना सहकार्य करतात असेही या गावात चौका चौकात चर्चाचा विषय आहे. नागरिकाच्या सुरक्षासाठी की अवैध धंदे चालवणाऱ्या मालकांना सहकार्य करण्यासाठी हा प्रश्न येथे गावात निर्माण झाला आहे.मागे मोवाड शहरात अनेक ठिकाणी चोऱ्या झाल्या पण त्याचा थाकपत्ता अजूनपर्यंत लागलेला नाही तक्रार कर्त्यानी विचारलं असता उडवाउडवीची उत्तर मिळतात यावरून पोलीस कर्मचारी फक्त नावापुरतेच आहे का असेही मनने वावगे ठरणार नाही. खैरगांव गावातील अवैध देशी दारू विक्री तात्काळ थांबावा.अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष नरेश भोयर, माजी तालुका उपाध्यक्ष वसंत पाटील, गावातील नागरिक नंदकिशोर बनाईत, गजानन वाडोदे, अजय बारमासे, गजानन कनिरे, मनसे महिला आघाडी शीला रंगारी, अरुणा वाटकर, रतन तागडे, हर्ष जैन, इंद्र वालके, आदी खैरगांववासी नागरिकांनी वरिष्ठान कडे केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post