मानापुर येथील तरुणाचा तलावात बुडून झाला मृत्यू

मानापुर :- प्राप्त झालेल्या माहितीनुसार आरमोरी तालुक्यातील मानापुर येथील जितेंद्र विठ्ठल गुरनुले वय 28 वर्षे हा तरुण तलावात डुबून मरण पावल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.

सविस्तर वृत्त असे आहे की, मानापुर येथील जितेंद्र विठ्ठल गुरनुले याांना दारूचे व्यसन होते अशी माहिती मिळालेली आहे. सदर तरुण काल सायंकाळी गावालगत असलेल्या तलावाकडे जाताना गावातील अनेक नागरिकांना दिसला. त्यामुळे गावातील नागरिकांनी रात्रोच त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु रात्र झाल्यामुळे शोध कार्य थांबवण्यात आले. परत आज सकाळी शोध कार्य सुरू केले असता आज सायंकाळीं 5.00 प्रेत तलावात आढळून आला अशी माहिती मिळालेली आहे.

त्या तरुणाचा प्रेत PM साठी आरमोरी उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी नेण्यात आले आहे. पुढील तपास काळबांडे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली आरमोरी पोलीस करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post