जिवापेक्षा रेती तस्करीचा अवैध धंदा महत्वाचा, महसूल व पोलीस प्रशासनाचे हात वर


सत्यवान रामटेके उपसंपादक 


ब्रम्हपुरी :-दिवाळीअगोदर पासूनच रेतीच्या तस्करीला वेग आला आहे. महसूल व पोलीस प्रशासन अवैध व्यवसाय व रेतीच्या काळाबाजारावर अंकुश लावल्याचा दिखावा करीत आहेत. मात्र त्यांच्या दाव्यांची पोलखोल होत आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातील वैनगंगा नदीलगत बहुतेक गावांतून अवैद्य रेती तस्करी केल्या जातात. त्यातीलच अर्हेर- नवरगाव येथून बेधडकपने रेती तस्करी केल्या जात आहे. दिवस असो की रात्र रेती तस्करांचा अवैद्य गोरख धंदा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यात रेती तस्करीच्या वाहनांनी गावातील मूल- मुली किंवा शाळकरी मुलींचा अपघात होत असतो मात्र पैशाचा जोरावर सर्व गोष्टी दाबल्या जातात. जिवापेक्षा रेती तस्करीचा धंदा महसूल विभाग व पोलीस प्रशासनाला महत्वाचा आहे का असा प्रश्न सामान्य माणसाला उपस्थित झाला आहे.

रेती तस्करीच्या वाहनाने रस्त्यावर खोल खड्डे पडून रस्त्याचे बेहाल झालेले आहे व रात्रीचा प्रवास जीवाला धोकादायक वाटतो. अर्हेर- नवरगाव ते ब्रम्हपुरी येथे ये- जा करणाऱ्या शाळकरी मुलांना व शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच रेतीतस्करांकडून अधिकाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी रस्त्या- रस्त्यावर व कार्यालयापुढे खबरी ठेवल्या जातात त्यामुळे अधिकाऱ्यांची हालचाल अगोदरच रेतीतस्करांना माहिती होते व संबधीत अधिकाऱ्यांना कारवाईविना खाली हातानी परतावे लागते. त्यामुळे महसूल विभागांनी व पोलीस अधिकाऱ्यांनी सापळा रचून रेतीतस्करांवर लवकरात लवकर आळा घालावा व सामान्य जनतेच्या असंतोषपणा दूर करावा अशी जनसामान्यांची मागणी आहे.













Post a Comment

Previous Post Next Post