तरुणांनो लग्नाची मुलगी मिळाली का... नाही न मग या मेळाव्यात आणि उरकून टाका

आधार सोशल विवाह संघाच्या वतीने दि. २७नोव्हेंबर २०२२रोजी "सद्दधम्म बुद्ध विहार" वैशाली नगर, भंडारा येथे वधु वर परिचय मेळाव्याचे आयोजन....

बौद्ध धर्मीय वधु वर विवाह परिचय उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहकार्य करण्याचे आवाहन......

भंडारा:- आधार सोशल विवाह संस्थेचे आयोजक संध्याताई बन्सोड यांनी सामाजिकतेचे भान ठेऊन बौद्ध समाजातील निराधार असलेल्या मुला मुलींना विवाह करण्यास अडसर निर्माण होऊ नये. म्हणून सदर संस्थेची स्थापना केली. आणि बौद्ध समाजातील उपासक व उपासीका यांचा परिचय करुण देऊन विवाहास लाभदायक असा उपक्रम सदर गृपच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. आणि याची सुरवात त्यांनी स्वतःच्या घरापासूनच केली आहे. या संस्थेमार्फत संध्याताई बन्सोड यांनी आपल्या स्वतःच्या मुलीचा विवाह जुळवुन आणला आहे. याच अनुषंगानं दि २७ नोव्हेंबर २०२२रोजी "सद्दधम्म बुद्ध विहार" वैशाली नगर, भंडारा यथे ११:००वाजता विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

आधार सोशल ग्रुप अंतर्गत बौद्ध धर्मीय वधू-वर विवाह परिचय उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत अनेक विवाह सोहळे पार पडले असुन सदर उपक्रमात नियोजित वधू वर परिचय मेळावा विवाह इच्छुक सभासदांसाठी घरपोच नोंदणी फार्म भरने, सोबतच सध्याचा बायोडाटा अपडेट करणे, विवाह इच्छुक स्थळांची अध्यावत माहिती देणे, आदी उपक्रम सदर संस्थेच्या मार्फतीने राबविल्या जात आहेत. तद्वतच या संस्थेचे विशेष म्हणजे उपासक उपासीका व त्याच्या परिवारातील सभासदांना वैवाहिक जीवनाकरिता आवश्यक त्या वेळी तज्ञ व्यक्ते बोलाऊन त्यांचेकडून मार्गदर्शन केले जाते.

सदर आधार विवाह संस्थेमार्फतीने याआधिही जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय विवाह परिचय मेळावे घेऊन विवाह सोहळे पार पाडण्यात आले आहे. सदर विवाह सोहळ्यास लागणारा खर्च संस्थेमार्फत केला जात असुन यापुढेही आधार सोशल संस्था भंडारा यांचे वतीने अनवरत निशुल्क सेवा देणार अशी ग्वाही संस्थेचे आयोजक संध्याताई बन्सोड यांनी दीली आहे.

विदर्भातील ग्रामीण व शहरी भागातील उपासक तथा उपासिका यांनी या सामाजिक उपक्रमात मोठ्या संख्येने भाग घ्यावा. सोबतच सदर आयोजीत विवाह मेळाव्यास उपस्थित राहुन सामाजीक चळवळीला मोलाचे सहकार्य करावे असे आवाहन विवाह संस्थेचे आयोजक संध्याताई बन्सोड तसेच ग्रुप मधील सर्व सदस्य यांचेकडुन करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post