लाचार मतदार, निष्क्रिय आमदार!

लाचार मतदार, निष्क्रिय आमदार!


   जळगाव हे जिल्हा चे ठिकाण आहे.विद्यापिठ आहे.तरीही परिस्थिती लाहोर सारखी बनली आहे.कारण काय? बुद्धी नाही का? शिक्षण नाही का? ज्ञान नाही का?पैसा नाही का?आहे .सर्वच आहे.कमी आहे फक्त प्रामाणिक पणाची,धाडसाची.म्हणून लाचारी आहे.मी रोज शंभर लोकांशी संवाद करतो.ते माझ्या समोर येऊन रस्ते बाबत दुःख व्यक्त करतात.रडतात.नशीबाला दोष देतात. कंबर दुखते, सांगतात.अगदी शर्ट आणि चड्डी उचकावून दाखवतात.म्हणतात,
" शिवराम पाटील, तुम्ही कितीही बोला, म्हणा.लोक लाचार आहेत.कोणीच बोलत नाहीत.तुम्ही एकटे बोलून बोलून काय उपयोग? जळगाव चे लोक बदलणार नाहीत.मताचे पैसे घेतात.गुंड, गुन्हेगारांना मतदान करतात.नगरसेवक , आमदार निवडून देतात.मत विकत घेणारी माणसे कशाला रस्ते बनवतील? जळगाव सुधारणार नाही.
    मी म्हणतो,काका," तुम्हाला इतके कळाले तरी पुरेसे आहे.तुम्ही जागृत झाले तरी माझे यश आहे.निवडून येण्यात माझे यश नाही.तो माझा व्यवसाय नाही.ते माझ्या उदरनिर्वाहाचे साधन नाही.म्हणून माझे एकट्याचे काही बिघडत नाही.बिघडते तेच.तुमच्यासारखे कंबर तुटले.म्हणून नगरसेवक व आमदाराला दोष देतो.तुम्ही म्हणता त्याप्रमाणेच मी म्हणतो.पण थोढे जास्त बोलतो.जर नगरसेवक किंवा आमदार पैसे देऊन मत विकत घेत असेल तर तो रस्ते बनवणारच नाही.शिवाय ज्या मतदाराने मताचे पैसे घेतले,तो तक्रार करू शकत नाही.तो भिकार माणूस मत विकून लाचार झालेला असतो.म्हणून बोलत नाही.तक्रार करण्याचे, बोलण्याचे नैतिक बळ त्याच्यात उरत नाही.तो लाचार झालेला असतो.त्याच लाचारीचा हा परिणाम आहे.नगरसेवक आणि आमदार तुम्हाला घाबरत नाहीत.तुम्हीच त्यांना घाबरतात.खरी मेख हीच आहे.मतदार लाचार म्हणून आमदार बेकार.अशा लाचार लोकांची आमदाराने तरी का कदर करावी?
        काही बिनडोक लोक भेटतात.म्हणे आम्ही मोदींकडे पाहून अपात्र उमेदवाराला मतदान केले.पण यांना हेच कळत नाही कि, जळगाव च्या आमदाराच्या मताने मोदी प्रधानमंत्री बनत नाहीत.तेथे खासदारांचे समर्थन लागते.मामाचा आणि मोदीचा काय संबंध?जर या लोकांनी मोदीकडे पाहून आमदाराला,नगरसेवकाला मतदान केले असेल तर ,मोदींनी कधी विचारले का? 
"मेरे पार्टी के विधायक ने रस्ते बनायेके कि नही?नही बनाये तो मैं बना देता हूं."
जर मोदींना अशी उपरती आलीच नाही तर तुम्ही मतदारांनी तरी मोदींना कधी तक्रार केली का?
"श्रीमान मोदी साहेब,तुम्हारा भाषण, आश्वासन सुनकर तुम्हारे पार्टीके नालायक आदमी को नगरसेवक चुनकर दिया.नालायक आदमीको विधायक चुनकर दिया.मगर,इस बदमाष ने रस्ते नही बनवाये." 
पक्ष एक असला म्हणून आपण कुठेही मत टाकावे का?हे लोकशाही ला मान्य नाही.राज्यघटनेत निवडणूक बाबत पक्षाचा उल्लेख नाही.व्यक्तीचा उल्लेख आहे.मत उमेदवार निवडण्यासाठी दिले पाहिजे.पक्षाला नाही.निवडणुक चिन्ह सुध्दा अडाणी,मुर्ख,बावळट लोकांसाठी मतपत्रिकेवर असते.त्याऐवजी तेथे उमेदवाराचा फोटो पाहिजे.हाच तो माणूस जो , तुमच्यासाठी रस्ते बनवणार आहे.हाच तो माणूस जो नगरपालिकेत तुमची. बाजू मांडणार आहे .आपला उमेदवार,आपला मतदार आपले हित पाहाणारा पाहिजे.हाच खरा कायदा आहे.म्हणून तर आम्ही सरळ प्रधानमंत्री ला मतदान करीत नाहीत.आम्ही मुख्यमंत्री ला मतदान करीत नाहीत.आम्ही महापोरला मतदान करीत नाहीत.आम्ही आमचा खासदार निवडतो.आम्ही आमचा आमदार निवडतो.आम्ही आमचा नगरसेवक निवडतो.तोच लायक पाहिजे.तोच सभ्य, सज्जन, बुद्धीमान, प्रामाणिक पाहिजे.
    भारतीय राज्यघटनेत असे कुठेही लिहीलेले नाही कि,मताचा योग्य मोबदला घेऊन मत द्यावे.तरीही जळगाव चे लोक मत विकून टाकतात.हे लोकशाही विरोधात नाही का?जर मतदारच लोकशाही विरोधात कृती करीत असेल तर रस्ता बनवण्याची अपेक्षा का करता?जर मतदारांनीच विकून खाल्ली,तर कदर करील कोण? खरी मेख तर हिच आहे.म्हणून म्हणतो,
" लाचार मतदार, बदमाष आमदार!
जळगाव तरी कसे सुधारणार ?" 

.... शिवराम पाटील.
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव.

Post a Comment

Previous Post Next Post