सावरगाव येथील महिला वाघाच्या हल्ल्यात ठार


नागभिड :- प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज दि.28/11/2022 सायं 4:00 वाजताच्या दरम्यान मौजा सावरगाव येथे शेतामध्ये धान कापणीचे काम करीत असताना श्रीमती. संगीता संजय खंडारे रा. सावरगाव तालुका. नागभीड जिल्हा. चंद्रपूर वय 45 वर्ष आपल्या शेतात धान कापणी करत असताना अचानक वाघाने हल्ला केला यात ती गंभीर जखमी झाली. त्यांना दवाखान्यात दाखल केले होते उपचरादरम्यान त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती मिळालेली आहे. त्यामूळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे तरी या वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post