तरुणाचा मृतदेह नहरात आढळला

जनकापुर:- येथे आजीच्या अंत्यविधीसाठी आलेला युवक गोसेखुर्द नहराच्या पाण्यात वाहुन गेल्याची घटना रविवारी (दि 30 आक्टो.) पाथरी पोलीस ठाणे हद्दीत घडली होती, चेतन रवींद्र कुमरे रा चारगांव असे वाहुन गेलेल्या युवकाचे नाव होते, रविवारी दिवसभर शोधमोहीम राबविण्यात आली पण त्याचा शोध लागेला. नाही, परत. सोमवारी सकाळ पासुन नहरात बोटीने शोधमोहीम राबविण्यात आली, सोमवारी पण उशिरापर्यंत त्याचा शोध लागलेला.नव्हता,तर मंगळवारी पुन्हा शोध मोहीम राबविण्यात आली आणि सकाळी 8 वाजता दरम्यान व्याहाड बुज ते कापसी रोडवरील नागोबा देवस्थान नहराजवळ त्याचा मृत्युदेह तरंगत असताना मिळाला, तब्बल दोन दिवसानंतर चेतन कुमरे चा मृत्युदेह मिळाला, चेतन हा आजीच्या अत्यंविधीसाठी संपूर्ण परिवारासोबत जनकापुर. येथे आला होता, अंत्यसंस्कारानंतर तो निलकंठ गेडाम, कुणाल धुर्वे, शैलेश धुर्वे सोबतच काही लोकासोबत आंघोळ करण्यासाठी गोसेखुर्द नहराजवळ गेला,

प्रज्जवल मडावी हा युवक सुरुवातीला नहरात उतरला, परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने वाहू लागला, त्याला त्याला वाचवण्यासाठी काही युवकांनी पाण्यात उडी घेतली, त्याच वेळी चेतनने सुध्दा पाण्यात उडी घेतली पण तो पाण्यात वाहु लागला, त्याला वाचविण्यात सोबतच्या युवकांना यश आले नाही, रविवार, सोमवारी दोन दिवस शोध मोहीम राबविण्यात आली तरीही शोध लागला नाही, परत मंगळवारी सकाळी शोधमोहीम राबविण्यात आली तेव्हा त्याचा मृत्युदेह व्याहाड बुज, कापसी नहरात सापडला,

सदर नहरात आजपर्यंत पाच ते सहा व्यक्तीचा तर अनेक वन्यप्राण्यांच्या जीव गेला असल्याने यासाठी किमान पाचशे मीटर वर पायऱ्यांची तर प्रत्येक गावालगत धुणेघाठ बांधण्यात यावे अशी मागणी सावली पंचायत समितीचे माजी सभापती विजय कोरेवार यांनी केली आहे

यावेळी पाथरीचे ठाणेदार मंगेश मोहोळ, यांच्या मार्गदर्शनात पाथरी पोलीस स्टेशनने शोध मोहीम राबविली, पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post