युवारंग द्वारा संचालित राजमाता जिजाऊ शक्ती कराटे ग्रुप तर्फे निशुल्क कराटे प्रशिक्षणाचे मानीव उद्घाटन* .

*युवारंग द्वारा संचालित राजमाता जिजाऊ शक्ती कराटे ग्रुप तर्फे निशुल्क कराटे प्रशिक्षणाचे मानीव उद्घाटन* .

युवारंग महापुरुषांच्या विचारांवर कार्य करणारे संघटन :- चंदाताई राऊत

आरमोरी :- नेहमी क्रीडा,  आरोग्य, शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या युवारंग द्वारा संचालित राजमाता जिजाऊ शक्ती कराटे ग्रुप, आरमोरी तर्फे आज दिनांक १ नोव्हेंबर २०२२ ला सकाळी ७ :०० वाजता स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या पटांगणावर निशुल्क कराटे प्रशिक्षणाच्या चवथ्या सत्राचे उद्घाटन कार्यक्रम पार पडले या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून युवारंग महिला कमिटीच्या मार्गदर्शिका मा.चंदाताई राऊत  तर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विधायक न्यूज चे मुख्य संपादक सामाजिक कार्यकर्ते मा. विलासजी गोंधळे साहेब  तर प्रमुख अतिथी म्हणून स्वय रक्तदाता गडचिरोली जिल्हा समितीचे अध्यक्ष मा.चारुदत्त राऊत सर, राजमाता जिजाऊ शक्ती कराटे ग्रुप, आरमोरी चे  मुख्य प्रशिक्षक मा. राजुजी घाटूरकर, सहप्रशिक्षक मा. राजूजी आतकरे उपस्थित होते याप्रसंगी अध्यक्षस्थानी मार्गदर्शक म्हणून मा. विलासजी गोंधळे यांनी राजमाता जिजाऊ ,छत्रपती. शिवाजी महाराज, छत्रपती शंभुराजे , क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, शहीद ए आझम भगतसिंग, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर मार्गदर्शन केले तर उद्घाटक म्हणून मा. चंदाताई राऊत यांनी युवारंग च्या सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा ,आरोग्य ,क्षेत्रातील कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली युवारंग च्या माध्यमातून आरमोरी शहरातील विद्यार्थ्यांचा मानसिक व शारीरिक विकास होत आहे निस्वार्थ मनाने नेहमी युवारंग सामाजिक कार्य करत राहील अशी ग्वाही चंदाताई राऊत यांनी दिली महिला व मुलींवरील  वाढत्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी महिलांना व मुलींना कराटे प्रशिक्षण देणे ही आजच्या काळाची गरज आहे युवारंग मागील ४ वर्षापासून सातत्याने शहरातील विद्यार्थ्यांसाठी निशुल्क कराटे प्रशिक्षणाचे आयोजन करत आहे शहरातील विद्यार्थ्यांचा मानसिक व शारीरिक विकास करणे हे युवारंग चे  मुख्य उद्देश आहे असे चंदाताई राऊत यांनी आपल्या मार्गदर्शनात आपले मत व्यक्त केले या कार्यक्रमाची संचालन राहुल जुआरे यांनी केले तर आभार राकेश सोनकुसरे यांनी मानले याप्रसंगी युवारंग चे सदस्य  लीलाधर मेश्राम, रोहित बावणकर, पंकज इंदुरकर, निखिल शेरकुरे, मयूर कांबळे व विद्यार्थी बहुसंख्य उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post