महिला पालक सभा उत्साहात संपन्न*


        स्थानिक जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा केशोरी येथे महिला पालक सभा मोठ्या उत्साहात पार पडली. पालक सभेमध्ये शेकडो महिला उपस्थित होत्या.
       पालक सभेचे अध्यक्ष शशिकला मसराम तर प्रमुख पाहुणे म्हणून पुनम देशकर, मालती चौरे, चारुना सुकारे, सुषमा ठाकरे, कविता बेलखोडे, नासिक मरसकोल्हे ,मुख्याध्यापक पी एन जगझापे उपस्थित होते.
         सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छाने व शब्दशुमनाने स्वागत करण्यात आले.
पालक सभेमध्ये प्रास्ताविक करताना मुख्याध्यापक पी एन जगझापे यांनी आपल्या पाल्याची प्रगती होण्यासाठी महिला पालकांनी सदैव तत्पर राहणे गरजेचे आहे, महिला पालक जोपर्यंत आपल्या पाल्याकडे विशेष लक्ष देत नाही तोपर्यंत पाल्याची प्रगती होणे अशक्य आहे, भारत सरकार तर्फे निपुण भारत हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. हा कार्यक्रम इयत्ता पहिली ते तिसरी साठी असून २०२६ पर्यंत इयत्ता इयत्ता तिसरी पर्यंतचे विद्यार्थी वाचन, लेखन व गणितीय क्रियांमध्ये सक्षम झाले पाहिजे यासाठी महिला पालकांचे गट तयार करून प्रत्येक गटाचे एक गटप्रमुख नेमण्यात आले. विद्यार्थी हा दहा ते पाच या वेळात शाळेत असतो बाकी वेळ आपल्या आई-वडीलाजवळ घालवत असतात. या वेळाचा सदुपयोग होण्यासाठी गटातील एका महिला पालकाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं असे सांगण्यात आले. वर्गातील काही विद्यार्थी मागे का पडतात याचे सविस्तर विवेचन मुख्याध्यापक पी एन जगझापे यांनी समजावून सांगितले. ज्याप्रमाणे आपण कुटुंबामध्ये मुलाला दर्जा देतो तोच दर्जा मुलीलाही दिला पाहिजे तरच मुलींची प्रगती झपाट्याने होईल असे प्रतिपादन केले.
        कार्यक्रमाचे संचालन गीता बडोले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हेमंत पवनकर, पवनकुमार कोहळे, गुंफेश बिसेन, नलू मरसकोल्हे, जीविका शहारे, वंश काडगाये यांनी प्रयत्न केले.

Post a Comment

Previous Post Next Post