साहेब, गुन्हा नोंदवाच!

साहेब, गुन्हा नोंदवाच!


जळगांवचे रस्ते बनवायचे सोडून नगरसेवक गेले पोलिस स्टेशनमध्ये .म्हणे" गुन्हा नोंदवा."
पोलिसांनी विचारले," कशासाठी?"
नगरसेवक म्हणाले,"ते माहीत नाही."
"अहो पण काहीतरी कारण सांगावे लागेल."
"सर, तुम्हाला वाटेल ते एखादे कारण लिहा.पण गुन्हा नोंदवा."
"बरं!नोंदवतो.आरोपी कोण?"
"साहेब, तुम्हाला वाटेल ते नांव लिहून टाका."
"असे कसे? गुन्हा सांगत नाहीत.आरोपीचे नांव सांगत नाहीत.तरीही म्हणे गुन्हा नोंदवा."
"साहेब, तुम्ही जाणिवपूर्वक आम्हाला टाळत आहात.आमची तक्रार का नोंदवून घेत नाहीत."
"अहो ताई,मी मान्य करतो.गुन्हा नोंदवून घेतो.तुम्ही जा घरी."
"नाही जाणार घरी.तुम्ही गुन्हा नोंदवला आहे तर त्याला अटक करा."
"कोणाला अटक करू?"
"कोणालाही करा.पण अटक करा.तोपर्यंत आम्ही येथून हालणार नाही."
"अहो मैडम,या इकडे .हा बघा . तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे आम्ही आधीच अटक करून ठेवलेला आहे."
"साहेब,त्याला आमच्या ताब्यात द्या.आम्ही चपलेने मारतो."
"तो आता आमच्या ताब्यात आहे.उद्या कोर्टात हजर करू."
"नाही.कोर्टात नको.आधी आमच्या ताब्यात द्या.त्याला आम्हीच शिक्षा करतो."
"ताई,तो काय तुमचा मुलगा आहे कि भाऊ आहे? तुम्ही कशी काय शिक्षा करणार?"
"हो.प्रत्येक महिला ही प्रत्येक माणसाची बहिण असते.कळत नाही का तुम्हाला?"
"हो कळते.पण हा माणूस तुमचा भाऊ नाही.तो आरोपी आहे."
"साहेब,ते नका सांगू आम्हाला.एकतर तुम्ही गुन्हा नोंदवत नव्हते.नोंदवला तर अटक करीत नव्हते.केली तर शिक्षा करू देत नाहीत."
"आम्ही याला उद्या कोर्टात हजर करतो.तो जामीनावर सुटेल.तेंव्हा तुम्ही काय करायचे ते करा."
"असे कसे? तुम्ही मोकळे सोडून द्याल.आणि आम्ही शोधत फिरायचे का?"
"अहो, आम्ही पकडतो.कोर्ट त्याला सोडते.तुम्ही उद्या कोर्टात सांगा कि,याला आमच्या ताब्यात द्या म्हणून."
"उद्या कशाला?आताच बोलवा कोर्टाला येथे."
"ओके.मी आताच बोलवतो,कोर्टाला येथे.शहरातील रस्ते खराब आहेत.कोर्ट येथे येण्यास उद्या अकरा वाजतील.मी पण एक डोकेदुखीची गोळी घेऊन येतो.मलाही या रस्त्यावरून येताना उद्या अकरा वाजतील."

... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव

Post a Comment

Previous Post Next Post