कॅसिनो(ऑनलाइन गेम) खेळायचा आहे चला मग आरमोरी शहरात...


आरमोरी:- आरमोरी स्थान हे शिक्षणाचे माहेरघर असलेल्या आरमोरी शहरात अवैध धंद्याना ऊत आले आहे. राजरोसपणे शहरातील मध्य भागात अवैध धंद्ये राजरोसपणे सुरु आहे. शहरात शांततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी पोलिस प्रशासनाने या अवैध व्यावसायिकांवर वेसण घालण्याची नितांत गरज शहरातील सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

शहरात रामसागर तलाव गेट समोर राजरोस पणे कॅसिनो मध्ये चार पाच कॅम्पुटर खुले आम चालवत असून या कडे प्रशासन दुर्लक्ष का करीत आहे हे गुपित कळत नसल्याचे बोलले जात आहे.

कॉम्पुटर द्वारे व नंतर मोबाईल वर खेळला जाणारा अवैध कॅसिनो चालत असून यात रोख रक्कम व फोन पे वर उलाढाल होत असल्याचे बोलल्या जाते. त्यात हजारो व लाखो रुपयांची उलाढाल होत असूनही प्रशासन डोळे झाक कशी करीत आहे हा यक्ष प्रश्न अनुत्तरित असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

आरमोरी शहरात कॅसिनो अवैध व्यवसाय जोमाने सुरू आहे. मात्र त्यांचेवर कुठलिही कारवाई होत नसल्याने सदर अवैध धंद्याना आळा बसताना दिसून येत नाही. नुकताच जीह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून नीलोत्पल यांनी पदभार स्विकारला आहे. त्यामुळे पोलिस अधिक्षकांनी आरमोरी शहरासह तालुक्यातील अवैध धंद्याकडे लक्ष केंद्रीत करुन कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

यावर अंकुश घालण्यात स्थानिक पोलिस प्रशासन अपयशी ठरली आहे. या अवैध धंद्यामुळे तरुण पिढी दारु, सट्टा, जुगाराच्या आहारी जाऊन स्वतःचे आयुष्य बरबाद करीत आहेत. तर अनेक कुटूंब उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. सदर अवैध व्यवसायात तरुण पिढीही गुंतले असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे या सुशिक्षित तरुण पिढीला रोजगार, स्वयंरोजगाराचे दालन उघडे करुन या अवैध व्यवसायाच्या जाळ्यातून मुक्त करण्याची जबाबदारी पोलिस प्रशासनाने पार पाडावी, अशी मागणी जोर धरत आहे

Post a Comment

Previous Post Next Post