तंटामुक्त समितीने वाजवून दिला प्रेमीकांचा शुभ मंगल सावधान

कोरची:- मुख्यालया पासुन 9 कि.मी.अंतरावर असलेला मसेली ग्रामपंचायत मध्ये दिनांक 23/11/2022 ला बुधवार ला दुपारी 2.00 वाजता तंटामुक्त समितीच्या पुढाकाराने आंतरजातीय विवाह सोहळा बौद्ध धर्माच्या रितीरिवाजा प्रमाणे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष प्रतापसिंह गजभिये यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. तंटामुक्त समितीचे सदस्य सर्वश्री सुनील सयाम सरपंच, विरेंद्र जांभुळकर उपसरपंच, वाय.एस.बन्सोड ग्रामसेवक, विद्या हिडामी (पोलीस पाटील ,),सौ.नलीनी सिद्राम, उर्मिला ताडामी, ,वरखडे मुख्याध्यापक शासकीय माध्यमिक आश्रमशाळा मसेली, डी.आर.मेश्राम मुख्याध्यापक छत्रपती हायस्कूल मसेली, मुख्याध्यापक मेश्राम सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मसेली, माणिकजी राऊत बौद्ध समाज अध्यक्ष, पुष्पाताई हिडामी अंगणवाडी सेविका, भिमराव अंबादे,परमानंद कराडे, इंदुबाई कराडे, किशोर ढवळे सौ.रंजना ठवळे इ. उपस्थितीत होते.

वर चि. प्रशिक रूंपचंद कराडे ( 22)रा..मसेली तालुका कोरची , वधु कु.खुशाली रधिराम मेश्राम वय( 20) रा.टेकाबेदळ ता.कोरची जिल्हा गडचिरोली. या दोघांचाही बऱ्याच दिवसापासून प्रेम संबंध सुरू होते. त्यांनी आंतरजातीय लग्न करण्याचे ठरविले होते. त्यामुळे त्यांनी मसेली येथील तंटामुक्तीच्या अध्यक्ष्याकडे रीतसर अर्ज करून लग्न लावून देण्याची मागणी केली. प्रतापसिंह गजभिये तंटामुक्त अध्यक्ष यांनी दोघांचे कागदपत्र तपासून तंटामुक्तीच्या माध्यमातून लग्न सोहळा पार पडला त्या यांचे मंगल परिणय भंते म्हणून अविनाश श्रीराम नंदागवळी यांच्या हस्ते पार पाडण्यात आले.

तंटामुक्त समीतीच्या वतीने जिवनावश्यक वस्तू भेट देण्यात आली.सदर कार्यासाठी ग्रामपंचायत मधील सर्व कर्मचारी यांनी सहकार्य केले.

वर वधूला पुढील जीवन जगण्यासाठी शुभेच्छा देण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post