महिलेवर बलात्कार केल्या प्रकरणी महावितरणमधील लिपिकास झाली अटक

महिलेवर बलात्कार केल्या प्रकरणी महावितरणमधील लिपिकास अलंकार पोलिसांनी अटक केली. याबाबत एका महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सचिन रावसाहेब निकम (वय ५३, रा. पंचवटी, पाषाण रस्ता) याला अटक करण्यात आलेल्या लिपिकाचे नाव आहे.


‘तू मला शिकवणार का?’ मंत्रालयाच्या गेटवर अडवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला संतोष बांगर यांची शिवीगाळ? आमदार म्हणाले “त्याने मला…”
निकम आणि तक्रारदार महिलेची ओळख होती. महिलेला सदनिका घ्यायची होती. सदनिका खरेदी व्यवहारात मदत करण्याच्या बहाण्याने निकमने महिलेला जाळ्यात ओढले. त्यानंतर तिला धमकावून बलात्कार केला. महिलेला मोबाइलवर अश्लील संदेश पाठविले. तिची बदनामी केली. महिलेने विचारणा केली. तेव्हा त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. महिलेेने तक्रार दिल्यानंतर निकमला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलीस उपनरीक्षक सरला दसगुडे तपास करत आहेत.



Post a Comment

Previous Post Next Post