वैरागड येथील मुरारी धनकर यांच्या परिवारास मिळाला पंतप्रधानमंत्री जिवन ज्योती विमा योजने अंतर्गत को.ऑप. बँक मधून लाभ. – पत्नीच्या मृत्यू नंतर पंतप्रधानमंत्री जिवन ज्योती विमाचे आर्थिक सहकार्य. – वैरागड जिल्हा मध्यवर्तीय को.ऑप. बँक शाखा व्यवस्थापक पद्दमाकर शेबे यांचे मोलाचे सहकार्य.


वैरागड : – येथील ग्रामपंचायत जवळील सती मोहल्ला येथे रहिवासी असलेले मुरारी धनकर यांच्या पत्नी रसिका धनकर यांचे एक वर्षा पूर्वी निधन झाले होते. त्यांच्या परिवाराला पंतप्रधान मंत्री जिवन ज्योती विमा योजने अंतर्गत वैरागड जिल्हा मध्यवर्तीय को.ऑप. बँक मधून दोन लाख रू. धनादेश (चेक) आर्थिक मदत मिळाले.

 



भारतभर पंतप्रधानमंत्री जिवन ज्योती विमा योजना अंतर्गत मृत्यू झालेल्या परिवारास कोणत्याही बँकेत विमा काढले असल्यास मृत्यू झालेल्या परिवारास दोन लाख रू. आर्थिक मदत दिल्या जाते. त्यानुसार येथील रसिका मुरारी धनकर यांचे दि. ११ नोव्हें. 2021 रोजी हृदय विकाराने मृत्यू झाले. त्यांच्या पच्यात सासू, पती, मुलगी आणि मुलगा तसेच मोठा परिवार आहे. स्व. रसिका मुरारी धनकर यांनी वैरागड जिल्हा मध्यवर्तीय को.ऑप. बँक मधून पंतप्रधानमंत्री जिवन ज्योती विमा योजनेचा विमा काढल्याने त्यांच्या मृत्यू नंतर वैरागड जिल्हा मध्यवर्तीय को.ऑप. बँक शाखा व्यवस्थापक पद्दमाकर शेबे यांच्या प्रयत्नाने मुरारी धनकर यांच्या परिवारास पंतप्रधानमंत्री जिवन ज्योती विमा योजनेचा लाभ त्यांच्या परिवारास मिळाला.


 
शासनाकडून मुरारी धनकर यांच्या बँक खात्यात विमाचे रुपये जमा होताच बँक शाखा व्यवस्थापक पद्दमाकर शेबे यांनी त्यांना त्वरित सूचना केली. दि. २५ नोव्हे. २०२२ रोजी वैरागड जिल्हा मध्यवर्तीय को.ऑप. बँक येथे त्याच्या परिवारास बोलावून विम्याचे दोन लाख रू. धनादेश (चेक) प्रदान केले. यावेळेस जिल्हा मध्यवर्तीय को.ऑप. बँक मध्ये बँक शाखा व्यवस्थापक पद्दमाकर शेबे, लिपिक राहुल अत्रे, शिल्पा वनारसे, सुजाता डोनारकर, शिपाई प्रमोद कुमोटी तसेच धनकर परिवारातील सुमित्रा तुलशिराम धनकर, मुरारी तुलशिराम धनकर, शिवा धनकर आणि प्रलय सहारे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post