वैरागड अंगनवाडीत पोषण आहाराचा पुरवठाच नाही,त्वरित पोषण आहाराचा पुरवठा करा अन्यथा बाल विकास प्रकल्प कार्यालय समोर उपोषण.- माजी आरमोरी पंचायत समिती उपसभापती विनोद बावनकर यांचा इशारा.

वैरागड अंगनवाडीत पोषण आहाराचा पुरवठाच नाही.

- लहान बालके अनेक दिवसापासून पोषण आहारापासून वंचित.
- त्वरित पोषण आहाराचा पुरवठा करा अन्यथा बाल विकास प्रकल्प कार्यालय समोर उपोषण.
- माजी आरमोरी पंचायत समिती उपसभापती विनोद बावनकर यांचा इशारा.

वैरागड : - येथील अंगणवाडीत अनेक दिवसापासून बाल विकास प्रकल्प अंतर्गत पोषण आहाराचा पुरवठाच झालेला नसल्यामुळे लहान बालके आहारापासून वंचित झालेले आहे. त्वरित पोषण आहाराचा पुरवठा करावा अन्यथा उपोषण करण्याचा इशारा माजी आरमोरी पंचायत समिती उपसभापती विनोद बावनकर यांनी दिला आहे.

बाल विकास प्रकल्प अंतर्गत प्रत्येक अंगणवाडीत पोषण आहाराचा पुरवठा होत असते. पोषण आहाराच्या माध्यमातून बालकांना खिचडी, उसळ आणि सोजी सारखे पोषण आहार दिल्या जाते. येथील अंगणवाडीत अनेक दिवसापासून पोषण आहाराचा पुरवठा होत नसल्याने माजी आरमोरी पंचायत समिती उपसभापती विनोद बावनकर यांनी अंगणवाडी क्र. १८ येथे भेट देऊन पोषण आहाराची माहिती घेतली.

लहान बालके अनेक दिवसापासून पोषण आहार पासून वंचित असल्याने त्वरित पोषण आहाराचा पुरवठा करावा अन्यथा बाल विकास प्रकल्प कार्यालय समोर उपोषण करण्याचा इशारा माजी आरमोरी पंचायत समिती उपसभापती विनोद बावनकर यांनी दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post