गुजरात सरकार कुंभकर्णासारखे झोपले आणि शेकडो जीव उद्धवस्त

मोदी-शहांचे गुजरात मॉडेल फेल, मोरबी पूल दुर्घटना
गुजरात सरकार कुंभकर्णासारखे झोपले आणि मोरबी पूल दुर्घटनेनंतर शेकडो जीव उद्धवस्त झाल्याने मोदी-शहांचे गुजरात मॉडेल फेल झाले आहे.
१९ व्या शतकात बांधलेल्या आणि अभियांत्रिकीचा करिष्मा म्हणून ओळखल्या जाणार्‍या गुजरातच्या मोरबी पुलावर पुन्हा एकदा १९० हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. हा झुलणारा पूल मोरबीतील शेकडो कुटुंबांसाठी आणि लोकांसाठी मृत्यूची घंटा ठरला. ही अत्यंत हृदयद्रावक घटना आहे. गुजरात मॉडेलचे ढोल बडवणारे लोक यातून धडा घेतील एवढीच अपेक्षा आम्ही करू, पण ते होईल, ही आशा फार कमी आहे. 
कारण मोरबीचा हा कलंक झाकण्यासाठी आणि त्याचा गुजरात निवडणुकीवर होणारा परिणाम हाणून पाडण्यासाठी संघी सरकार पुन्हा एकदा आपल्या परिचित जनविरोधी मोहिमेत गुंतले आहे. मोरबी भविष्यात पुन्हा मृत्यूचे साक्षीदार होऊ नये यासाठी आपण काहीतरी करू, अशी प्रतिज्ञा करण्याची आणि शोक करण्याची हीच वेळ आहे.
वास्तविक, ज्यांना जनहिताची पर्वा नाही अशा लोकांचा भार मोरबी पुलाला पेलता आला नाही. त्याचबरोबर पुलाची देखभाल करणार्‍या कंपनीची गुन्हेगारी कार्यशैली आणि न्यायालयीन नोकरशाहीचा बोजा यापुढे सहन होत नाही. तसेच हा झुलणारा पूल मोरबी नगरपालिकेचा निष्काळजीपणा सहन करू शकला नाही. 
येथे केवळ पूलच तुटलेला नाही. इथे अनेकांचे जीवन उद्धवस्त झाले, आशा इथे मावळल्या, श्‍वास कोंडला आणि माणुसकी तुटली. शहरांची आणि रस्त्यांची नावे बदलली, स्थानकांची नावे बदलली, मग या १०० वर्षांच्या ब्रिटिशांनी बांधलेला मृत्यूचा पूल का बदलला नाही? गुजरात मॉडेलचा ढोल बडवणार्‍या निर्मात्यांना अगोदरच पुलाची मोडतोड का करावीशी वाटली नाही? असा सवाल केला जात आहे.
 सध्या १९० हून अधिक लोकांचे प्राण घेतल्यानंतर तेथील सरकार कुंभकर्णी झोपेतून जागे झाले आहे. एसआयटीची चौकशी झाली आहे, पण मूळ प्रश्‍न तोच आहे, मोदी आणि शहा यांची कठपुतळी गुजरात सरकार खरोखरच गुन्हेगारांना पकडू शकतील का? छोट्या माशांवर कारवाई करून मगरींना असेच सोडले जाईल, जे पुन्हा निष्पाप जीवांचे सौदे करत राहतील. 
ही काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा गुजराती नववर्षानिमित्त दुरुस्तीनंतर स्थानिक प्रशासनाने सेफ्टी एनओसी न घेता हा पूल सुरू केला होता, जेणेकरून भाजपला विधानसभा निवडणुकीत त्याचा लाभ घ्यायचा होता. मात्र नूतनीकरणानंतरही या पुलाने अनेकांचे प्राण घेतले, त्यामुळे या मृत्यूंना जबाबदार कोण? एफआयआरमध्ये जबाबदार लोक आणि एजन्सीचे नावच नाही.


गुजरात विधानसभा निवडणुकीच्या लाभासाठी भाजपाच्या दबावाने खुला केला मोरबी पूल
काळ्या बाजारात विकल्या गेल्या मृत्यूच्या तिकीट, स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांचा बँड बाजासहित उत्सव
 गुजरात विधानसभा निवडणुकीचा लाभ उठवण्यासाठी भाजपाने दबाव बनवून मोरबी पूल खुला केला. त्यातच तिकीटांचा काळाबाजार करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक त्या ठिकाणी जमले होते. एकप्रकारे काळ्या बाजारात मृत्यूच्या तिकीट विकून तेथील प्रशासन मोकळे झाले.
मोरबी दुर्घटनेला आमंत्रित केले गेले आहे. या पुलाच्या दुरस्तीसाठी एक वर्ष लागणार होते. परंतु दुरूस्ती करण्यापूर्वीच ६ महिने अगोदरच हा पूल पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. गुजरात विधानसभा निवडणुकीचा लाभ उठवण्यासाठी भाजपाने दबाव बनवून मोरबी पूल खुला केल्याचे समोर येत आहे. पूल खुला करण्यात आल्याने गेल्या तीन दिवसापासून तिकीट विक्रीचा काळा बाजार करण्यात आला.


मोरबी पूल घटनेतील शेकडो लोक मृत्यूमुखी पडले असतांना व जखमींना भेटण्यासाठी पंतप्रधान मोदी मोरबी दवाखान्यात भेट देणार आहे...!!
म्हणून अत्यंत नित्कृष्ठ दर्जाचा असलेल्या दवाखान्याचे रात्रीतून नुतनीकरण केले जात आहे. 





१७ रूपयांचे मृत्यूचे तिकीट काळ्या बाजारात ५० रूपयांना विकले गेले. कॉन्ट्रॅक्टरनुसार त्यांनी प्रत्येक दिवस २१० तिकीट विकल्या गेल्या. मात्र ज्यावेळी दुर्घटना घडली तेव्हा त्या पुलावर ५०० पेक्षा जास्त लोक हजर होते. जर २१० तिकीट विक्री झाली असेल तर ५०० लोक कुठून आले? असा सवाल केला जाऊ शकतो.
दरम्यान, एवढी मोठी दुर्घटना घडूनही सरदार पटेल यांच्या जयंतीच्या पार्श्‍वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या कार्यक्रमाला बँड बाजासहित सहभागी झाले होते. मोरबी दुर्घटनेवर केवळ दोन वाक्य बोलून मोदींनी पुढचे भाषण निवडणुकीसंबंधित केले. त्यामध्ये राष्ट्रीय एकता दिवसाच्या पार्श्‍वभूमीवर आज देशभरात ७५ हजार एकता दौड होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्या ठिकाणी मोफत वॅक्सिन, उज्ज्वला योजना, शौचालय, टाळी-थाळी वाजवणे, मोफत औषध, मोफत राशन या संदर्भात त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
बसानकांठा थराद येथे मोठी जनसभा होणार आहे. त्या जनसभेला मोदी संबोधित करणार आहेत. प्रधानमंत्र्यांना मोरबी दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या लोकांचे काही नाही, त्यांच्याशी काहीच देणे-घेणे नाही. केवळ ते निवडणूक अभियान पुढे घेऊन जाण्यासाठी काम करत आहेत असा काही लोकांचा आरोप आहे. एका बाजूला गुजरातमध्ये १९० लोक मृत्यूमुखी पडतात तर दुसर्‍या बाजूला प्रधानमंत्री बँड बाजा वाजवून उत्सव साजरा करत आहेत. सोशल मीडियावर याबाबत मोठी टीका करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post