तो पुन्हा आला.... वाघाच्या हल्ल्यात जगन ठार...

ब्रम्हपुरी : सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या इसमावर हल्ला करून ठार केल्याची घटना आज दिनांक 5/11/2022 ला उघडकीस आली. जगन हिरामण पानसे वय 75 वर्षे रा. लाखापुर येथील रहिवाशी असे वाघाच्या हल्यात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे.

सविस्तर वृत्तांत असे आहे की, जगन हा सरपण गोळा करायला जंगलात (ता.4 नोव्हें.) ला गेला होता. मात्र, दिवस निघून गेला जगन घरी परत आला नाही. जगनचा शोध लाखापुर गावशेजारील असलेल्या शेत व जंगल
परिसरात कुटुंबीयांनी व घर शेजाऱ्यांनी रात्रीचे 7:00 वाजेपर्यंत घेतला. मात्र, जगनचा कुठेच थांगपत्ता लागला नाही. हिच शोधमोहीम दुसऱ्या दिवशी म्हणजे 5/11/2022 ला सकाळीं सुरुवात केली असता, जंगलात हिंस्त्र प्राणी यांनी भक्ष केला असावा अशा अवस्थेत जगनचा मृतदेह आढळून आला. लगेच ही माहिती वनविभाग यांना देण्यात आली. काही वेळातच वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल झाली. व मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता ग्रामीण रुग्णालय मध्ये रवाना करण्यात आले. यात निष्पन्न झाले की, जगनचा मृत्यु हा वाघाने हल्ला करून झाला. तसेच मृतक जगनच्या कुटुंबीयांना 25 हजाराची आर्थिक मदत वनविभागाकडून देण्यात आली.

मात्र, दोन तिन दिवसात दोन घटना वाघाच्या हल्यात ठार झाल्याच्या घडल्या आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिक दहशहतीत आले असून जगनच्या निधनाने पानसे कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. संभाव्य वाघाचे धोके लक्षात घेता संबधीत वनविभागाने नरभकक्षक वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी पानसे कुटुंबीयांसह परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post